एक्स्प्लोर

आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार : खासदार अनिल बोंडे 

Anil Bonde : आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिलीय. लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान असल्याचे अलिल बोंडे यांनी म्हटले आहे.

अमरावती : आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी एबीपी माझासोबत (Abp Majha) बोलताना दिली. शिवाय आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही खासदार बोंडे म्हणाले.

खासदार बोंडे म्हणाले, "अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड मधील आरोपी देखील लव्ह जिहादला प्रोत्साहित करायचा. त्याने इंदोर मधील मुलगी पळून आणली होती. शिवाय मेळघाट मधील मुलींना प्रलोभनं देऊन किंवा धमक्या देऊन पळवून घेऊन जातात. यावर मी एक बिल आणणार आहे. बोगस संस्था हे विवाह लावून देतात, यात खोटा मौलवी उभा केला जातो. अमरावतीची जी मुलगी पळून गेली होती त्या मुलीच्या आई-वडिलांनी रडत- रडत मला फोन केला होता. आमच्या मुलीला शोधा अशा विनवण्या त्यांच्याकडून करण्यात येत होत्या. त्यानंतर ते खासदार नवनीत राणा यांच्याकडे गेले. त्यानंतर नवनीत राणा या पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला असेल तर त्यात वावगं काय? 

गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीची मुलगी पश्चिम महाराष्ट्रात सापडली होती. याबाबत बोंडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ती मुलगी साताऱ्यात कशी सापडली? कोणाच्या मदतीने पोलिसांना ती सापडली? ज्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते त्याच मुलाच्या मोबाईलमधून ती कुठं आहे हे कळलं? हे सर्व समोर आणलं पाहीजे, असं मत अनिल बोंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. 

दरम्यान, या आधी देखील अनिल बोंडे यांनी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना आपण लव जिहाद बाबत अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे म्हटले होते. "राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे अनिब बोंडे यांनी दिली होती.  

"लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे. मेळघाटातातील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणलं जातं. मुलींनी विरोध केला तर त्यांना जीवही गमवावा लागतो, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद' चा आरोप 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime: चक्क डॉक्टरकडून साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अमरावतीत डॉक्टरकडून चक्क साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Congress: चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू; यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget