Akola News: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील मनब्दा गावातील विद्रूपा नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. ऋषीं संतोष सुरळकर आणि सागर संतोष दांडगे असे या दोन्ही मयत मुलांचे नावे आहेत. दोघेही 13 वर्षांचे होते. मृत मुले आज दुपारी विद्रूपा नदीकाठी गेली होते. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली आसावित असा प्राथमिक अंदाज आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावातील ऋषीं संतोष सुरळकार, सागर संतोष दांडगे आणि पियूष आशिष तायडे हे तिघे जण मित्र आज रविवारी दुपारी गावातील विद्रूपा नदीत नदीकाठी गेले होते. यातील दोघे जण म्हणजेचं ऋषी आणि सागर आंघोळीसाठी नदीत उतरले. परंतू पाण्याचा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली. याची माहीती सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने गावकऱ्यांना दिली. मुन्ना पाथ्रीकरसह अन्य गावकरी नदीकाठी पोहचले अन् पाण्यात उड्या घेतल्यात. बुडलेल्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत सागर आणि ऋषींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांना मिळताच ज्ञानोबा फड आणि पोलीस कर्मचारी संदीप तांदूळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचेही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून याप्रकरणी स्थानिक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहीती सुरळकर आणि दांडगे कुटुंबाला मिळताच त्यांना धक्का बसला. या घटनेनं मनब्दा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.


यामूळे बुडालेत दोन्ही चिमुकले 


या दोघांचं मृत्युचं कारण समोर आलं आहे. आज हे तिघे जण मित्र, त्यातील ऋषि आणि सागर यांच्या वडिलांचा जेवणाचा डब्बा घेवून जात होते. या दोघांचेही वडील शेत मजूर आहे. ज्या शेतात त्यांचे वडील काम करीत होते. ते विद्रूपा नदीच्या दुसऱ्या काठावर शेत होते. शेतरस्ता नदीच्या पात्रातून असल्याने हे मुले नदीतून जात होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. अन् मृत्यु झाला, अशी माहीती पोलिसांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्य: 


Gadchiroli Police : गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई; तीन जहाल नक्षलवाद्याला केली अटक
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक, 19 ऑक्टोबरला मतमोजणी