Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिल्या 9 संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या यादीत बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar South Lok Sabha Constituency) भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शरद पवार (Sharad) गटाकडून सुजय विखे पाटलांविरोधात तगडा नेता शोधण्याचे आव्हान होते. त्यामुळे अजित पवार गटातून नुकतेच शरद पवार पवार गटात दाखल झालेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांना अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके ही लढत निकराची होणार असून त्यामागची करणे जाणून घ्या...


ही आहेत पाच कारणे



  1. अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. 

  2. कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 

  3. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. 

  4. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. 

  5. नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील लंकेंना विजयी गुलाल उधळण्यासाठी हातभार लागणार आहे.


शरद पवार गटाचे हे आहेत संभाव्य उमेदवार


बारामती - सुप्रिया सुळे 
माढा - महादेव जानकर (रासप) 
सातारा - बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील 
शिरुर - अमोल कोल्हे
नगर दक्षिण - निलेश लंके 
बीड - बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे 
वर्धा - अमर काळे


निलेश लंकेंच्या पत्नीचे सूचक वक्तव्य


गेल्या काही वर्षांमध्ये निलेश लंके यांची नगर पट्ट्यातील लोकप्रियता चांगली वाढली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे निलेश लंके हे सुजय विखेंना चांगली टक्कर देऊ शकतात. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आज सूचक वक्तव्य केले आहे. मी किंवा निलेश लंके या दोघांपैकी एकजण नक्की उभा राहणार आहे, असे वक्तव्य राणी लंके यांनी केले आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


आणखी वाचा 


Sharad Parar on Ajit Pawar Faction : शरद पवारांचा अजित पवार गटाला सूचक इशारा! निवडणूक लढणार की नाही? यावरही बोलले