एक्स्प्लोर

Shirdi : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साई दरबारी भक्त आणि सुरक्षारक्षकात हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Shirdi Viral Video : शिर्डी सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमधील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी साईभक्ताच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर : तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमध्ये (Sai Baba) मारहाण झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. समाज माध्यमात या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलीसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. भक्तांनी दर्शन घेताना नियमांचं पालन केलं पाहिजे तर सुरक्षा रक्षकांनी अशा प्रसंगी कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती दिली पाहिजे असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून केवळ राज्यातून नव्हे देशभरातील लाखो भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यभरातून अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत आल्या.  मुंबईहून शिर्डीत पायी पालखी घेऊन येणाऱ्या अशाच एका साईभक्त आणि साईबाबा संस्थान सुरक्षारक्षकात शुक्रवारी दुपारी मारहाणीची घटना घडलीय. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताने पाच नंबर एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न .मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

या हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर आता साईभक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाव नोंदवण्यात आला आहे. भक्तांनीसुद्धा दर्शन घेताना, या परिसरात वावरताना नियमांचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांनीसुद्धा असा प्रसंग उदभवल्यास कायदा हातात न घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

यापूर्वीही अनेकदा शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांच्या वादाच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने आणि विनम्रपणे बोलायला हवे, यासाठी शेगावच्या धर्तीवर साइसेवक योजना सुद्धा राबविण्यात आली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत खऱ्या अर्थाने भक्तांनीसुद्धा नियमांचे पालन करण्याबरोबरच साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही.

शिर्डीत तीन दिवसीय राम नवमीची सांगता 

साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) रामनवमी  उत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. या तीन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. तीन दिवसीय उत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज (31 मार्च) सकाळी गुरुस्‍थान मंदिरात जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. तर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली. दुपारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्‍या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी  फोडण्यात आली. साईमंदिरात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Dilip Khedkar : दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Embed widget