Shirdi Sai Mandir Security :  शिर्डी साईबाबा मंदिराची (Shirdi Saibaba Temple News) सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने (aurangabad bench) साईबाबा संस्थानला (Sai Baba Sansthan) तसे निर्देश दिले असून 5 जानेवारीला या संदर्भात प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश साईबाबा संस्थानला दिला आहे. केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा खर्च जास्त असल्याने त्याऐवजी महाराष्ट्र पोलिस बल (Maharashtra Police) आणि राज्य राखीव पोलिस बलाची (SRPF) सुरक्षा घेता येईल अशी भूमिका संस्थानच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टात मांडली. यावर कोर्टान 5 जानेवारीपर्यंत याबाबत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. 


सामाजिक कार्यकर्ते संजय काळे (Sanjay Kale) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) हे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने (ABP Majha News)  या प्रश्नावर 2 महिन्यांपूर्वी विशेष रिपोर्ट करत सुरक्षेचा प्रश्न समोर आणला होता.


साईबाबा मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल


देशातील सर्वाधिक भाविकांची गर्दी असलेले धार्मिक तीर्थस्थळ म्हणून साईबाबांच्या शिर्डीची (Sai Baba shiridi) गणना होते. साईबाबा मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिला आहे. अनेक वेळा निनावी पत्र , मेलच्या माध्यमातून साईमंदिराला धमकीचे पत्रही मिळाली आहेत. साई मंदिराला सीआयएसएफ किंवा सीआरपीएफची सुरक्षा मिळावी यासाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 


5 जानेवारी रोजी संस्थानला प्रगती अहवाल सादर करावा लागणार


औरंगाबाद उच्च न्यायलयाने साईबाबा संस्थानचे अध्यक्ष (Sai Baba Mandir) तथा जिल्हा दंडाधिकारी यांची बाजू ऐकून घेतली. केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा खर्च जास्त असल्याने त्याऐवजी महाराष्ट्र पोलिस बल आणि राज्य राखीव पोलिस बलाची सुरक्षा घेता येईल अशी भूमिका मांडली याबाबत 5 जानेवारी रोजी संस्थानला आपला प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे.


आज साईबाबा मंदिराची सुरक्षा स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकासह संस्थान सुरक्षा कर्मचारी करत असून या नवीन सुरक्षेच्या निर्णयामुळे साई मंदिराच्या सुरक्षेत वाढ होईल. 


ही बातमी देखील वाचा


Nagpur Shirdi ST Bus : समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बस सेवा उद्यापासून; जाणून घ्या तिकीट दर अन् वेळापत्रक