Ahmednagar shevgaon News: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील (Ahmednagar latest Update)  सालवडगावपासून अगदी 2 किलोमीटर असलेल्या हनुमानवस्ती ही 350 लोकवस्ती असलेलं छोटेखानी गाव. मात्र गावत जाण्यासाठी आजही रस्ता नसल्याने गावातील माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ex soldier appeal cm eknath shinde) यांना पत्र पाठवून हेलिकॉप्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे. याआधी गावात जाण्यासाठी एका ओढ्यातून रस्ता होता, मात्र या ओढ्यावर बंधारे बांधण्यात आल्याने तोही रस्ता बंद झाला आहे. 


पावसामुळे काम रखडलं आणि ओढ्यावरही अतिक्रमण


शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून 2 किलोमीटर असलेल्या  हनुमानवस्तीवर विखुरलेल्या या वस्तीत 350 लोक राहतात. मात्र, जुन्या ओढ्यातून रस्ता होता, मात्र त्यावरही बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे रस्त्याचं काम रखडलं. तत्कालीन तहसीलदार पागिरे यांनी रस्त्यांची पाहणी केली कामंही सुरू होणार होते मात्र, पावसामुळे काम रखडलं आणि ओढ्यावरही अतिक्रमण झालं. वर्षानुवर्षे रस्त्याची अशीच परिस्थिती असल्याने सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक दत्तू भापकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी अनुदान देण्याचीच मागणी केली आहे. 


विद्यार्थ्यांचंही होतंय मोठं नुकसान


रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, पावसाळ्यात तर आठवड्यातून एकदा दोनदाच शाळेत जाता येतं. त्यामुळे एकीकडे समृद्धी महामार्गासारखा रस्ता होत असताना दुसरीकडे केवळ 2 किलोमीटरचा रस्ता होत नसेल तर ते दुर्दैव असल्याचं इथले विद्यार्थी सांगतात.


रस्ता नसल्याने काहींनी शेतजमिनी विकल्या तर काहींनी जनावरे विकली


धडधाकट व्यक्तीला या ओढ्यातून धड चालता येत नाही. त्यामुळं  रुग्णांची आणि दिव्यांगांची काय स्थिती असेल याचा विचार न केलेला बरा.  रस्ता नसल्याने काहींनी शेत जमिनी विकल्या तर काहींनी जनावरे विकली, काहींनी तर घरं सोडून तालुक्याच्या ठिकाणी राहणं पसंत केलं. खरं तर या ओढ्यातून 40 फुटी रस्ता आहे मात्र, शेतीमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालंय ते काढून एका बाजूने रस्ता तर दुसऱ्या बाजूने ओढा असं होऊन रस्ता होऊ शकतो, मात्र त्यासाठी आवश्यकता आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. 


ही बातमी देखील वाचा