एक्स्प्लोर

कोपरगावात भाजपच्या कोल्हे विरोधात विखेची मोर्चेबांधणी सुरू, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत केले विविध विकास कामांचे भूमिपूजन

राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवला असून कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.  

शिर्डी :  राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil)  यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणुकीत भाजपच्या (BJP)  विवेक कोल्हे (Vivek Kolhe)  यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat)  यांच्याशी युती करत विखेंचा कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवला असून कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे आगामी काळात कोल्हे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हटलं की, काळे विरुद्ध कोल्हे ही पारंपारिक लढत नेहमीच चुरशीची ठरते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे विवेक कोल्हे हे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर हात मिळवणी करत विखेंना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. विखे यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणूक असेल किंवा राहता तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये विखेंचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या थोरात यांना बरोबर घेत कंबर कसल्याच दिसून आलं. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव मतदारसंघात लक्ष घातले असून राष्ट्रवादीचे आमदार अशितोष काळे यांना बरोबर घेत त्यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. 

राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता कोल्हेंवर टीका

मंगळवारी सकाळी नियोजित दौरा खराब हवामानामुळे उशिरा सुरू झाला.  कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात पालकमंत्री विखे यांनी आपल्या सासरवाडीतून केली. संवत्सर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं. यावेळी झालेल्या नागरिक सत्कार सोहळ्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यासह राजेश परजणे हे उपस्थित होते. हे सर्वजण कोल्हे यांचे विरोधक समजले जातात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणातून आशुतोष काळे यांची स्तुती करताना कोल्हे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

भाजपच्या कोल्हे आणि विखे या दोन नेत्यांमध्ये मतभेद

राष्ट्रवादी अजित पवार गटाने शरद पवार यांचा फोटो वापरू नये असा सल्ला खुद्द शरद पवारांनी दिला होता.  मात्र आज कोपरगाव तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजनाचे फ्लेक्स राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी लावले होते. विशेष म्हणजे या फ्लेक्स वर शरद पवारांचाही फोटो होता. एकूणच भाजपच्या कोल्हे आणि विखे या दोन नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपासूनच मतभेद होते. आगामी काळात याचा फटका भाजपाला बसणार की त्याचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गट उचलणार हे आगामी काळात स्पष्ट होईल..

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget