Sanjay Raut in Shirdi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) काहीही बोलतील त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नका. हे सगळे मनोरुग्ण आहेत. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. संजय राऊत  (Sanjay Raut) सध्या अहमदनगर दौऱ्यावर असून साई बाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी (Shirdi) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज (दि.2) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दौऱ्यावेळी लोणी गावातील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधक असलेल्या प्रभाताई घोगरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटी दिली. लोणी येथे जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं. दर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपापासून तर बारामतीत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यावर भाष्य केले.


वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झालाय 


संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ जागावाटपाचे निर्णय झालेले आहेत. वंचितने जागांचा प्रस्ताव दिलाय त्यावर प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट केलेच आहे. लवकरच शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेस नेत्यांसह आंबेडकर यांची बैठक होणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 


शिर्डीची जागा शिवसेना लढवणार 


शिर्डीची जागा शिवसेना लढवणार आहे. ही जागा शिवसेना सातत्याने जिंकत आलीय. आमच्या पक्षाने इथे प्रचाराला देखील सुरवात केली आहे. चर्चेत प्रत्येक पक्ष जागा मागत असतो. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो मात्र पुढे जायचं असतं. फडणवीस यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे कोणी विश्वासघात केला. फडणवीस आज जे बोलतात तोच विश्वासघात आहे. 2014 साली कोणी युती तोडली? त्यानंतर मातोश्रीवर निमंत्रण घेऊन कोण आलं, असा सवाल राऊत यांनी केलाय. काल निधीवरून एका मंत्र्याने मार खाल्ला. सुदैव आहे इथल्या पालकमंत्री यांच्यावर ती वेळ आली नाही.


शरद पवारांचा तो इलाका ते धमाका करणारच


सरकार राज्याचे आहे कोणा एका पक्षाचे नाही. मोदींनी वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होत. या देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. सरकार कोणतही असो त्यांनी जर याप्रश्नी निर्णय घेतला तर त्याच स्वागत केलच पाहिजे. राजकीय लढाया एका बाजूला ठेवल्या पाहिजेत. मात्र कोणी आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल तर स्वागत आहे. ज्या बारामतीत शरद पवारांनी अनेक उद्योग आणून रोजगार दिला तिथे मेळावा होतोय. तिथे तुम्ही राजकारणासाठी मेळावा घेत असाल, मात्र शरद पवारांचा तो इलाका ते धमाका करणारच, असे संजय राऊत यांनी नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Anganewadi Jatra: आंगणेवाडीच्या जत्रेत राजकीय गाऱ्हाणी; उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाईकांचा, मोदींच्या यशासाठी राणेंचा भराडी देवीला नवस