एक्स्प्लोर

दिल्ली पोलिसांकडून मनोरमा खेडकरांचे नामनिर्देशन पत्राची चौकशी

Pooja Khedkar: पथकाने तहसील कार्यालयातच डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्याची माहिती घेतली.

Pooja Khedkar अहमदनगर: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संदर्भातील कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी काल पाथर्डी येथील तहसील कार्यालयात दिल्ली पोलिसांचे दोन जणांचे पथक आले होते. या पथकाने स्थानिक प्रशासनाकडून पूजा खेडकर यांच्या आई आणि भालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवताना जे नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत दाखल केले होते ते नामनिर्देशन पत्र आपल्या ताब्यात घेतले.

पोलिसांचे पथक खेडकर (Pooja Khedkar) कुटुंबाचे गाव असलेल्या भालगाव येथे सुद्धा जाईल असे वाटत होते. मात्र भालगावला न जात या पथकाने तहसील कार्यालयातच डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्याची माहिती घेतली. डॉ. खेडकर यांनी मागील वेळेस झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर त्यानंतर झालेल्या भालगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या आणि बहुमताने निवडूनसुद्धा आल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते आणि त्याच्यासोबत जी कागदपत्रे निवडणूक शाखेत दाखल केली होती. त्या सर्व कागदपत्रांची आज दिल्लीच्या पथकाने छाननी करत या कागदपत्रांच्या प्रति आपल्यासोबत नेल्या. या संदर्भात या पथकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

नेमकं प्रकरण काय?

पूजा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget