एक्स्प्लोर

मांजराला वाचवण्याच्या नादात अख्खं कुटुंब संपलं, नगरमध्ये बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा मृत्यू

Ahmednagar News: सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

अहमदनगर : मांजराला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला  आहे.  बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. विहिरीतील विषारी वायूने गुदमरून पाच जणांचा मृत्यू  आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सुमारास तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला.  मात्र त्याला बाहेर यता येत नसल्यानं एका मागे सहाजण एकमेकांना वाचवण्यासाठी त्या खड्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने  अडथळे येत होते.  परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात आलं मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला.

पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून नेमका हा सगळा प्रकार कसा घडला हे तपासानंतर समोर येईल. माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. काल रात्री चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एकाला वाचवण्यात यश आले. आपात्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अखेर पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बायोगॅसच्या या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता.मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 4 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले. 

हे ही वाचा :

गुढीपाडव्याच्या दिवशी विरारमध्ये दुर्दैवी घटना, एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू

                         

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Ahilyanagar Rain: भंडारदऱ्यात निसर्गाचं तांडव! 24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती, कळसूबाई, सांदन व्हॅलीसह 'ही' प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद
भंडारदऱ्यात निसर्गाचं तांडव! 24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती, कळसूबाई, सांदन व्हॅलीसह 'ही' प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Embed widget