अहमदनगर : पंतप्रधान मोदी (PM Modi) 2024 मध्ये जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ देतील, तेव्हा महायुतीचे महाराष्ट्रातून (Maharashtra MP) 45 खासदार यावेळी हातवर करून उभे राहतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच आम्ही अशाप्रकारे महाविजयाचा संकल्प आम्ही केला असून, त्याकरता प्रत्येक लोकसभेत साडेतीन लाख लोकांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही जात असून त्यासाठी घर चलो अभियान सुरू केल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून तत्पूर्वी त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना भाजपच्या मिशन 2024 ची रणनिती मांडली. एकीकडे केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे लोकसभेसाठी काही नावाच्या चर्चांना उधाण आलं आहे. जळगावातून (Jalgaon) उज्ज्वल निकम, पुण्यातून (Pune) सुनील देवधर मुंबईतून (Mumbai) एका जागेवर माधुरी दीक्षित, धुळ्यातून (Dhule) प्रतापराव दिघावकरांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षात केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यामध्ये चर्चा झाल्यावरच निर्णय होतो. सध्या ज्या चर्चा सुरु आहे, त्या फक्त अफवा दिसत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलंय. तसेच 2024 मध्ये पंतप्रधान मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ देतील, तेव्हा महायुतीचे महाराष्ट्रातून 45 खासदार यावेळी हातवर करून उभे राहतील, असा महाविजयाचा संकल्प आम्ही केला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस कन्फ्युजन करणारी पार्टी
शरद पवार (sharad Pawar) यांनी अदाणी यांची भेट घेतली आणि एका पावर प्लांटचे उद्घाटन केले. या भेटीबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. इंडिया आघाडीचं सध्या काय चाललय समजत नाही, हिंदू धर्माला संपवण्यासाठी पक्ष तयार झालाय, असं उदयनिधी स्टॅलिन सांगत आहेत. त्यामुळे माझा प्रश्न राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thackaray) यांना असून इंडिया आघाडी पक्ष हिंदू धर्माला संपवण्यासाठी तयार झाला असून या अजेंड्याबरोबर उद्धव ठाकरे जाणार का? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या (Congress) ब्लडमध्ये कॅन्सर आहे, काँग्रेस कधीही डेव्हलपमेंट बाबत बोलत नाहीत, कन्हवेसिंग राहिलेलं नाही, काँग्रेस कन्फ्युजन करणारी पार्टी असल्याचं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. तसेच ज्या सरकारकडे 225 यावर बहुमत आहे, रोज लोक आमच्याकडे येण्यास तयार आहेत. कालही दहा लोकांची यादी आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आमचे सरकार भक्कम आहे. 2024 च्या निवडणुकीपर्यंत ते सव्वादोनच्या वर जाईल आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता करताही येणार नाही, हे महाराष्ट्राची जनता करणार आहे. महाराष्ट्राची जनता मोदींवर विश्वास ठेवून आहे, महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून आहे आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदार आणि दोन खासदार आमचे असतील, असा विश्वासही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
दोन्ही आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, तसेच आताही सध्या साखळी उपोषण सुरू असून मनोज जरांगे पाटील यांचा तो अधिकार आहे आणि 13 कोटी जनतेच्या विश्वासावर आम्ही राज्य करतोय, त्या पक्षाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा दिला आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता भाजप मराठा समाजाच्या पाठीशी उभा असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत बैठक घेऊन चर्चा केली आहे, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र कुठल्याही न्यायालयीन प्रक्रिया आडव्या येऊ नये. कुठलेही न्यायालयीन प्रक्रिया आडव्या आल्या तर मिळालेले आरक्षणही जाते, ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच झालं, त्याप्रमाणे होऊ नये म्हणून आरक्षण टिकावं त्यासाठी मुख्यमंत्री तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धनगर समाजाने सरकारची वाट पहावी, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
अजित पवार म्हणजे सूर्योदयासारखा प्रकाश
महायुती अजित पवार यांना डावलले जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले असून अजित पवार हे महायुतीमध्ये आल्यामुळे काही लोक अस्वस्थ झाले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये जे स्थान निर्माण केलं, ते स्थान त्यांचे फार मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा अंत होतोय, सूर्यास्त होतोय. तेव्हा त्या ठिकाणी खरंतर जेव्हा सूर्यास्तासारखा असतो, तेव्हा अंधार होतो आणि आता राष्ट्रवादीमध्ये अंधार पडलेला आहे. अजित पवार यांनी सूर्योदयासारखा प्रकाश तयार केला आहे. त्यामुळे इतर लोकांकडे अंधार झाला आहे, असं वक्तव्य यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अपात्र आमदार प्रकरणी सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. याबाबत भाजपचा काही बी प्लॅन तयार नसून त्याची काही गरज नसल्याचं सांगत राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. तसेच नियमाप्रमाणे आणि आतापर्यंतच्या विधिमंडळाच्या कामकाजाप्रमाणे ते पुढे जातील, या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे मला वाटतं राहुल नार्वेकर लवकर निर्णय घेतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत नागपूर येथील पूर परिस्थितीवरून भाजपवर टीका केली होती. नागपूरात विकासाच्या नावाखाली जी सिमेंटची जंगलं वाढली आहे, त्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असून, याला काही नेते जबाबदार आहेत, अशा आशयाचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांनी नागपूरच्या विकासासाठी एक रुपया खर्च केला नाही, त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही, आम्ही नागपूर बघायला समर्थ आहोत, ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही, त्यांनी नागपूरवर बोलू नये असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. तसेच कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. यावर प्रश्न विचारला असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चितपणे उत्तर दिले असून आजपर्यंत 40 मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
इतर महत्वाची बातमी :