(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : 'देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेनवर उपचार करून नीट करावं, आपल्याजवळच ठेवावं', मराठा समाजाकडून टीकास्त्र
Ahmednagar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुणरत्न सदावर्ते यांना आपला पीए बनवावं आणि आपल्याजवळच ठेवावं.
अहमदनगर : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चांगल्या मनोरुग्णाला दाखवून त्यांना नीट करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी गुणरत्न सदावर्ते यांना आपला पीए बनवावं आणि आपल्याजवळच ठेवावं, असा घणाघात अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेवगाव येथील सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील सालवडगाव येथे टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservation)आंदोलनाला आता राज्यभरात पाठिंबा मिळत सकल मराठा बांधव एकजूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातील बहुतांश गावांमध्ये गावबंदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी दौऱ्यावर असताना अनेक गावांनी सभास्थळी जाण्यासाठी पाठवलेल्या बसेस परत पाठवल्या होत्या. तर काही ठिकाणी थेट वबसेसची तोडफोड करण्यात आली होती. आता याच शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील नागरिकांनी सालवडगाव गावात टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सोबतच गावामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी देखील करण्यात आली. दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सकल मराठा समाजाने जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना शासनाने तातडीने अटक करावी, तसेच मनोज जरांगे पाटील यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांना चांगल्या मनोरुग्णाला दाखवून त्यांना नीट करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना आपला पीए बनवावं आणि आपल्याजवळच ठेवावं असा घनाघातही सालवडगाव ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे आंदोलनाचे लोण हळूहळू संपूर्ण राज्यात पसरत असल्याचे दिसत आहे.
आमदार मोनिका राजळेंचा ताफा अडवला!
अहमदनगरमध्ये पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajle) यांचीही गाडी अडवण्यात आली. राजळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडीला आल्या होत्या. सकल मराठा समाजाने त्यांचा ताफा रोखला. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, नाहीतर राजीनामे द्या अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
इतर महत्वाची बातमी :
Mangesh Sable on Sadavarte : मंगेश साबळेची जामिनावर सुटका, बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंना इशारा