Ahilyanagar Crime News: एक हात, एक पाय बांधलेला; पत्नीसोबतच्या वादातून पतीने चार मुलांसह जीवन संपवलं, बायकोने शाळेत फोन केला पण...
Ahilyanagar Crime News: कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत हे पाच जणांचे मृतदेह आढळून आले. अरुण काळे (वय 30 वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.

आहिल्यानगर: आहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी वाद झाल्यानंतर आपल्या माहेरी गेली, तिने परत घरी येण्यास नकार दिल्यानं रागातून पतीने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकललं (Ahilyanagar Crime News) नंतर आपणही पाय आणि हा बांधून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं आहे, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत हे पाच जणांचे मृतदेह आढळून आले. अरुण काळे (वय 30 वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.(Ahilyanagar Crime News)
अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावाचा रहिवासी आहे. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहेरी गेलेली पत्नी (Ahilyanagar Crime News) सततच्या वादाला वैतागून परत सासरी येण्यास नकार देत होती. तिला परत घरी घेऊन यायला निघालेल्या पतीने वाटेतूनच आपल्या पत्नीला फोन लावला; पण तिने पतीचा नंबर ब्लॉक केला. याचा राग आल्याने एक मुलगी, तीन मुले अशा चौघांना शुक्रवारी (दि. 15) रात्री राहाता तालुक्यातील कोन्हाळे शिवरातील विहिरीत ढकलून देत स्वतः आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी समोर आली. पाच जणांचे मृतदेह सायंकाळी विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
चार चिमुकल्या लेकरांचा बळी...
मुलगी शिवानी काळे (वय 8), मुलगा प्रेम काळे (वय 7), वीर काळे (वय 6) व कबीर काळे (वय 5) अशी मयत मुलांची तर अरुण सुनील काळे (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. मयत हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असून महिलेचे माहेर येवला तालुक्यामध्ये आहे. चिखली (ता. श्रीगोंदा) येथील अरुण सुनील काळे (वय 30) याची पत्नी शिल्पा अरुण काळे वादामुळे येवला तालुक्यातील माहेरी गेली होती. ती परत येत नव्हती. दरम्यान, शनिवारी राहता तालुक्यातील कोऱ्हाळे (जिल्हा अहिल्यानगर) शिवारातील याच विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळून आले (दि. 16) दुपारी विहिरीत दोन मृतदेह तरंगताना काही मेंढपाळांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिर्डी व राहाता नगरपरिषदेचे आपत्ती निवारण पथकाला मदतीसाठी बोलवले. दोन लहान मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. त्या विहिरीत 30 ते 35 फूट पाणी होते. त्यामुळे पाण्यात उतरून मदतकार्य अशक्य होते. त्यानंतर गळ सोडून शोध मोहीम सुरु करण्यात आली. त्यानंतर एका पाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अरुण काळेचा एक हात व एक पाय बांधलेला
अरुण सुनील काळे याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता त्याचा एक पाय व एक हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत होता, असे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
आईने मुलांच्या शाळेत फोन केला; पण उशीर झालेला...
शिल्पा अरुण काळेला पती अरुणने फोन करून नांदायला ये नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर शिल्पा हिने मुलांच्या शाळेत फोन करून मुलांना पतीसोबत पाठवू नका, असे सांगितले. मात्र, त्याआधीच अरुण काळे हा आपल्या मुलांना घेऊन गेला होता.
























