एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जानेवारी 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जानेवारी 2020 | गुरुवार*
- दिल्लीतील जामियामध्ये सीएए कायद्याविरोधातील मोर्चा सुरु होण्यापूर्वी गोळीबार, एक आंदोलक जखमी, आरोपीला अटक, गोळीबाराआधी आरोपीचं फेसबुक लाईव्ह https://bit.ly/2REfCvf
- भारतातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळात, खास वॉर्डात उपचार सुरु, हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती https://bit.ly/2GD7k09 तर 'कोरोना'मुळे चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील, मदतीसाठी सरकारला विनंती https://bit.ly/36Epolh
- आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, अर्थमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, तर फडणवीसांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडलाही ब्रेक लावण्याचे संकेत https://bit.ly/2S5BKNW
- भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप, आरोपींना वाचवण्यासाठी एनआयएकडे तपास दिल्याचा दावा https://bit.ly/2GyGaYf
- राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये तासभर खलबतं, 9 फेब्रुवारीच्या मोर्च्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता तर परवानगीसाठी मनसे नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट https://bit.ly/2O8OYsk
- शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास सत्ता स्थापन करु, भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांचं वक्तव्य तर मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका https://bit.ly/38OHVNc
- कोल्हापूर महापालिकेत मुका घ्या मुका! भरसभेत विरोधक नगरसेवकाने घेतली सत्ताधारी नगरसेवकाची पप्पी, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/38OIcjc
- लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता रेल्वेच्याच तिकीटदरात मिळणार विमानाचं तिकीट, मुंबईतील तरुणांच स्टार्टअप असलेलं 'रेलोफाय' अॅप लॉन्च https://bit.ly/2S0aSiu
- वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह, सोहळ्याला राज्यभरातून हजारो भाविकांची पंढरपुरात गर्दी https://bit.ly/316YVeO
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन, महिलांना पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून विशेष ओळख https://bit.ly/2uOlvwE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement