एक्स्प्लोर

Nagpur Crime : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अभिषेक सापडला, कॉंग्रेस नेत्यांसोबत दिल्लीवारीचे फोटो झाले होते व्हायरल

अभिषेक कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात नेत्यांसोबत फोटोमध्ये दिसून येत होता. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला होता, हे विशेष. पोलिसांनी अभिषेक व अंकितला फरार घोषित केले होते.

नागपूरः गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत शहरात सर्रास शहरात फिरणारा मकोकाचा फरार आरोपी अभिषेक सिंग अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर तो पोलिसांच्या हातील लागला, हे विशेष.

2020मध्ये कुख्यात रोशन शेख टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन उपायुक्त गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते. या टोळीवर हप्ता वसूली, अपहरण, जमिनीवर कब्जा, महिलांना ब्लॅकमेल करणे आदी गुन्हे दाखल होते. रोशनच्या टोळीत अभिषेक सिंह, अंकित पाली, इरफान खान, सलीम काजी तसेच सोहेल बरकाती होते. पोलिसांनी रोशन, खानू, सलीम व सोहेल याला अटक केली होती. अभिषेक सिंग व अंकित पाली फरार होते.

कॉंग्रेस नेत्यांसोबतच्या दिल्लीवारीमुळे चर्चेत

अभिषेक कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात नेत्यांसोबत फोटोमध्ये दिसून येत होता. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला होता, हे विशेष. पोलिसांनी अभिषेक व अंकितला फरार घोषित केले होते. अभिषेक सिंह याने जमानतीसाठी मकोका न्यायालय व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल केली.

पोलिसांची कारवाई योग्य

सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईला योग्य ठरवित अभिषेकची याचिका फेटाळून लावली. अभिषेकला न्यायालयात सादर करून पोलिसांनी 7 दिवसाची कोठडी मिळविली आहे.

अंकित पाली फारारच!

या टोळीचा प्रमुख रोशन शेख अजूनही कारागृहात आहे. त्याच्या तीन साथीदाराना जमानत मिळाली आहे. अभिषेकच्या अटकेनंतर आता अंकित पाली हा फरार आहे. त्याच्याविरुद्ध खून व अन्य प्रकरणात गुन्हे दाखल आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या बाबत पोलिसांना कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणात सुरुवातीपासून सहभागी असलेला एक डॉक्टरदेखील चर्चेत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis Eknath Shinde: हाच 'तो' एक प्रश्न, ज्याचं उत्तर देणं एकनाथ शिंदेंनी टाळलं

Sambhajiraje Chhatrapati : मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं: संभाजीराजे छत्रपती

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan : जीवाभावाचा रविदादा! रविंद्र चव्हाण यांच्यासोबत हजारो भगिनींनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा
जीवाभावाचा रविदादा! रविंद्र चव्हाण यांच्यासोबत हजारो भगिनींनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा
MPSC पेपरफुटी प्रकरण! मुंबई क्राईम ब्रँचची नंदूरबारमध्ये धडक, 10 तासांपासून घरांची झाडाझडती सुरु, महत्वाचे धागेदोरे हाती लागणार?
MPSC पेपरफुटी प्रकरण! मुंबई क्राईम ब्रँचची नंदूरबारमध्ये धडक, 10 तासांपासून घरांची झाडाझडती सुरु, महत्वाचे धागेदोरे हाती लागणार?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सध्या नेमका किती दर?  
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सध्या नेमका किती दर?  
ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Embed widget