एक्स्प्लोर

इंदापूरच्या तानाजी शिंगाडेंची स्मार्ट शेती, काकडीतून लाखोंचं उत्पन्न

पुणे:  इंदापूरच्या तानाजी शिंगाडे या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीत बदल केले. नियंत्रित शेतीची कास धरली. शेडनेटमध्ये काकडीचं पीक घेतलं आणि अवघ्या तीन महिन्यात लाखोंचा नफा कमावला. कशी साधली तानाजीने ही किमया? पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे तानाजी शिंगाडे. एक  तरुण आणि प्रयोगशील शेतकरी. इथल्या कडबनवाडीत वडीलोपर्जित १६ एकर शेती आहे. यात पूर्वी डाळिंबाचं पीक होतं. मात्र विविध किडी आणि त्यानंतर आलेल्या तेल्यानं बागेवर हल्ला केला. उत्पन्न मिळेनासं झालं. अशातच नियंत्रित शेतीची माहिती मिळाली. शेडनेट उभं करण्याची कल्पना वडिलांना दिली. मात्र खर्च जास्त असल्यानं सुरुवातीला वडिलांनी नकार दिला. मात्र शेडनेट उभारणीसाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानातून मदत मिळत असल्यानं वडीलांनी संमती दिली. तानाजी शिंगाडे यांनी बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला. काकडीचा पर्याय निवडला. जमिनीची मशागत करुन बेड तयार केले. याला सेंद्रीय तसंच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. मल्चिंग पेपर अंथरला, त्याला २ फुटांवर भोकं पाडून घेतली. ठिबकच्या ड्रिपलाईन अंथरल्या. दोन बेडमध्ये ४५ सेंमी अंतर सोडलंय. पुण्याहून ८ रुपयांना एक याप्रमाणं काकडीचं बी आणलं. ४० गुंठ्यासाठी त्यांना ८ हजार बिया लागल्या. बी महाग असल्यानं घरच्या घरीच लागवड केली. ठिबकमधून खतं आणि पाणी दिल्यानं रोपांची उगवण चांगली झाली. २० दिवसात तारकाठी केली. अवघ्या ३५ व्या दिवशी काकडी तोडणीस आली. सध्या दिवसाआड दीड ते दोन टन काकडीची तोडणी होतेय. ही काकडी क्रेटमध्ये भरुन मुंबई बाजारात पाठवली जाते. *आतापर्यंत १४ टन काकडीचं उत्पादन मिळालं आहे. *ही काकडी बाजारात २५ ते ३० रुपये किलोनं विकली गेलीय *यातून तानाजी यांना २ लाख ८० हजार रुपये मिळाले आहेत. *अजून २ महिने तोडा सुरु राहणार असून यातून ३५ टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा तानाजी शिंगाडे यांना आहे. *म्हणजेच तानाजी यांना अजून ७ लाख हजार रुपये मिळतील *यातून बँकेचा हप्ता, बियाणं, खतं, किडनाशकं, वाहतूक असा २ लाख ५० हजारांचा खर्च आला. *म्हणजेच तानाजी शिंगाडे यांना या काकडीतून अवघ्या ३ महिन्यात ७ लाखांचा निव्वळ नफा होईल. शेतीत सतत प्रयोग करत राहण्याची तानाजी शिंगाडे यांची वृत्ती. वडील पारंपरिक शेती करत असले तरी त्यांची समजूत काढून त्यांनी शेतीत बदल केले. नियंत्रित शेतीचा मार्ग निवडला. बाजाराचा अभ्यासातून काकडीचं पीक निवडलं. अवघ्या ३ महिन्यात या काकडीनं तानाजी शिंगाडेंना पंचक्रोशीत फेमस केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ, मृत्यूचं कारण अस्पष्ट 
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ, मृत्यूचं कारण अस्पष्ट 
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Embed widget