एक्स्प्लोर

गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट

ग्रामीण भागात शेती, दुग्धव्यवसाय डबघाईला गेल्याची चर्चा सुरु असतानाच केवळ दुग्ध उत्पादन करुन देवरे कुटुंबानं वर्षाला 36 लाख रुपयाची कमाई करण्याची किमया साधली आहे.

नाशिक : आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींकडे न पाहता नाशिक जिल्ह्यातील मेहुण गावच्या देवरे कुटुंबानं एक आदर्शच शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. ग्रामीण भागात शेती, दुग्धव्यवसाय डबघाईला गेल्याची चर्चा सुरु असतानाच केवळ दुग्ध उत्पादन करुन देवरे कुटुंबानं वर्षाला 36 लाख रुपयाची कमाई करण्याची किमया साधली आहे. गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट वसुबारसाच्या दिवशी गोधनाचं महत्त्व अनन्य साधारण असतं. याच गोधनामुळे नाशिक जिल्ह्यातील मेहूण गावच्या देवरे कुटुंबानं प्रगती साधली आहे. केवळ दुग्ध उत्पादनातून या कुटुंबाला वार्षिक 36 लाखांचं उत्पन्न मिळतं. ३० एकर शेती असूनही दुष्काळामुळे उत्पन्न मिळंत नव्हतं. अशा परिस्थितीत या कुटुंबानं दुग्ध व्यवसायाचा पर्याय शोधला आणि आज ते वर्षाला जवळपास ३६ लाखांचं उत्पादन मिळवत आहेत. गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट मालेगाव तालुक्यातील मेहुण गावात समाधान, बाळू आणि अनिल या देवरे बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. २०११ साली त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी बँकेकडून २५ लाखांचं कर्ज घेतलं. यातून दीड एकरात८ लाखांना त्यांनी शेड उभारल्या आणि उरलेल्या पैशात गाई आणि म्हशींची खरेदी केली. एकत्र कुटुंबामुळे प्रत्येकाचं या व्यवसायात काही ना काही योगदान असतं. आज देवरे कुटुंबाकडे एकूण ६० गाई आणि म्हशी आहेत. यात गाईच्या जर्सी तर म्हशीच्या मुर्हा आणि जाफराबादी जातीचा समावेश आहे. या कुटुंबाचा दिनक्रम त्यांच्या पशुधनासोबत सुरु होतो. त्यांना पाणी देण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टिमचा वापर होतो. गाईंचं दूध मशीनद्वारे काढलं जातं. तर म्हशींचं दूध हातानं काढतात. गुरांना सकाळ संध्याकाळ ओला आणि सुका चारा दिला जातो. त्याबरोबरच ज्वारी,बाजरी आणि मका यांचा भरडा ओला करुन दिला जातो. गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट जनावरांच्या रोजच्या खाद्यासाठी १० हजार रुपये खर्च येतो. दिवसाला दररोज जवळपास साडेपाचशे लिटर दूध मिळतं. या दुधाची ३६ रुपये लिटरनं विक्री होते. यातून सुमारे रोजचे २० हजार रुपये मिळतात. यातून खर्च वजा जाता महिन्याला या कुटूंबाला तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर वर्षाला छत्तीस लाख रुपये मिळतात. त्यातून बँकेचा हफ्ता फेडला तरी २४ लाख रुपये वर्षाकाठी शिल्लक राहतात. गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट शेतीतील कमी उत्पन्नामुळे खचून न जाता या कुटुंबानं दुग्ध व्यवसाय केला. एकत्रितपणे काम करत या व्यवसायाला मोठं केलं. आता या व्यवसायाचा व्याप आणखी वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. देवरे कुटुंबानं या व्यवसायातून शेतकऱ्यांसमोर एक चांगलं उदाहरण निर्माण केलं आहे. VIDEO : 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Industry : साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Embed widget