एक्स्प्लोर

राज्यात आतापर्यंत 139 मिमी पावसाची नोंद

मुंबईः राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून 1 जून ते 28 जून अखेर 139.4 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या 66.9 टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 109.5 टक्के एवढा झाला होता.   राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगामाची तयारी सध्या जोरात सुरु झाली आहे. राज्यातील अनेक भागात पेरणी झाली आहे.   राज्यातील पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार सांगली, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.   रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अकोला या दहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.   ठाणे, धुळे, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या तेरा जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे.   नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस आणि नाशिक जिल्ह्यात 0 ते 25 टक्के पावसाची नोंद झाली आहे.   राज्यातील 9 टक्के क्षेत्रावर पेरणी राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस पीक वगळून) 139.64 लाख हेक्टर असून 24 जून अखेर 13.22 लाख हेक्टर क्षेत्रावर (9 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात इतर पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली आहे.   धरणात 9 टक्के पाणी साठा राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत सध्या केवळ 9 टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास 25 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणेः
  • मराठवाडा-1 टक्के (7)
  • कोकण-28टक्के (42)
  • नागपूर-16 टक्के (25)
  • अमरावती-11 टक्के (32)
  • नाशिक-8 टक्के (20)
  • पुणे-7 टक्के (31)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget