नाशिक : भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चार दिवसांपूर्वी चर्चा झाल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या चर्चेत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीतील कामकाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. राज्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर घडलेल्या घडामोडींची माहितीही जे पी नड्डा यांना दिल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

Continues below advertisement

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजय-पराभव तसेच आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याने काही जागांवर आपल्याला फटका बसला याचीही माहिती त्यांनी घेतली. तुम्ही दिलेली माहिती आणि आमच्याकडील माहितीच्या आधारे आम्ही चौकशी करु, असं आश्वासन जे पी नड्डा यांनी एकनाथ खडसेंना दिलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी चर्चा करु. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंतर बोलावून घेऊ. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी पक्षाविरोधात काम केलं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करु, असं आश्वासनही जे पी नड्डा यांनी दिल्याची माहिती खडसेंनी दिली आहे. भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे, मात्र मी समाधानी आहे की नाही, ते कारवाई झाल्यानंतरच सांगेन. मात्र त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता, असंही खडसे म्हणाले.

Continues below advertisement

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळे

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेकारस्थानामुळेच झाला, असा आरोप खडसेंनी केला होता. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कुणी काम केले याची विश्‍लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या