नाशिक : सूर्यग्रहण काळात पाणी न सोडण्याचा निर्णय त्र्यंबक नगरपरिषदेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सूर्यग्रहण काळात शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ग्रहणकाळ संपल्यानंतर शहराला पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. नगरपरिषद अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप केलाय, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.


तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मधील नागरिक पालिकेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. देशभरातुन भाविक त्र्यंबक नगरीत पूजा पाठ करण्यासाठी दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय प्रत्येक ग्रहण काळात घेतला जातो, त्यात वावगं काही नसल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा - आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण, क्रिकेट सामन्यांच्या वेळेत बदल, शिर्डीसह अनेक मंदिरंही ग्रहणकाळात बंद राहणार

आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण -
चालू वर्षातलं आणि या दशकातलं(2010 ते 2019)शेवटचं सूर्यग्रहण आज पाहायला मिळाले. हे सूर्यग्रहण भारतात कंकणाकृती असून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील काही भागातून दिसले. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला 'फायर रिंग' असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.

हेही वाचा - ...म्हणून पंतप्रधान मोदी सूर्यग्रहण पाहू शकले नाहीत

शिर्डीतील साई मंदिर तीन तास बंद -
ग्रहण असल्यामुळे शिर्डीतील साई मंदिर आज तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आले. कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत साईंचं समाधी मंदिर बंद होतं. या काळात समाधी मंदिरात मंत्रोच्चार बंद होता. साईमंदिराप्रमाणे देशभरात आज अनेक मंदिरं ग्रहणवेळेत बंद ठेवण्यात आली. या ग्रहणामुळे आज होणारे रणजी ट्रॉफीमधील सामन्यांच्या वेळतही बदल करण्यात आला.

हेही वाचा - क्रिकेटलाही 'सूर्यग्रहण', सामने उशिरा सुरु होणार; बीसीसीआयची माहिती

Solar Eclipse | देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण, मुंबईसह महाराष्ट्रात तीन तास ग्रहण | ABP Majha