नाशिक : बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागलाय. सकाळी धुकं आणि त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान टोमॅटो, द्राक्ष अशा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी हातातलं पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे कांद्यानंतर यावेळी टोमॅटोलाही चांगला भाव मिळत होता. मात्र, आता रोगांमुळे हे पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील महिन्यात टोमॅटोचे भाव तेजीत होते. कांद्यापाठोपाठ टोमॅटोही भाव खात होता. मात्र, आता हाच टोमॅटो आता जणावर खाऊ लागले आहेत. 60/70 रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो 2/3 रुपये किलोपर्यंत खाली घसरला आहे. नाशिक जिल्ह्यात गिरणारे गावात टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या बाजारातून देशातच नाही तर परदेशातही टोमॅटो जात असतो. मात्र, आज हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परतीच्या पावसाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यापुढे पुन्हा अस्मानी संकट येऊन उभं आहे. लाखो रुपये खर्च करुन वाढवलेलं पीक हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय. गेल्या आठदहा दिवसापूर्वी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. त्यामुळे कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, अचानक ढगाळ हवामान आल्यानं त्याचा फटका पिकांना बसू लागलाय. पहाटे दाट धुकं, त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान शेती पिकांवर रोग पडायला सुरुवात झालीयं. पान जळून गेली असून पिकांची वाढही खुंटली आहे.

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे एकनाथ खडसेंकडून स्वागत!

जी स्थिती टोमॅटोची तीच द्राक्ष बागांची होत आहे. सुर्यप्रकाश मिळत नसल्यानं करपा डवण्यां रोग पडायला सुरुवात झालीयं. मनी गळत असून पानही करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्च केलेली बाग आता डोळ्यांदेखत उध्वस्त होत असल्यान कर्जमाफीपेक्षा वीज बिल माफ करावे, खत औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे. पुढचा एक दोन महिना शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने कमाईचा राहणार होता. मात्र, निसर्गापुढे शेतकरी हवालदील आहे. सरकारकडून मदत मिळत नसल्यानं अस्मानी आणि सुलतानी संकटाना तोंड देता देता नाशिकचा शेतकरी हवालदील झालाय. त्यातच पुन्हा पाऊस पडला तर शेतकरी उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होतेय.

कांद्याचा भाव उतरला -
तब्बल 100 रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्याचा भाव आता उतरला आहे. बाजारात आवाक वाढल्याने कांद्याचा भाव किलोमागे 50 ते 60 रुपये झाला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने कांद्याच्या दरात सारखा चढउतार सुरू आहे. दरम्यान, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचा भाव गेल्या मागील आठवड्यापासून हळूहळू खाली येऊ लागला आहे.

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस

Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत | ABP Majha