एक्स्प्लोर

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.

नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जोशी थोडक्यात बचावले. महापौर संदीप जोशी काल रात्री त्यांचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस  सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

संदीप जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस असल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी तिथे कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम आटपून सर्व मित्र नातेवाईक नागपूरकडे परतत असताना संदीप जोशी एका मित्रासह त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये सर्वात मागे होते. 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्यांची कार आऊटर रिंग रोडवर परसोडी जवळील एम्प्रेस पॅलेसजवळ असताना मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. एक गोळी संदीप जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागील बाजूला लागली.

संदीप जोशी स्वतः कार चालवत होते, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. हल्ला झाला त्यानंतर प्रसंगावधान राखत संदीप जोशी यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला वळवली. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर काल रात्रीपासूनच संदीप जोशी यांचा पाठलाग करत असावे, असा अंदाज आहे. दरम्यान गेल्या 12 दिवसात संदीप जोशी यांना पत्राच्या माध्यमातून दोन धमक्या आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्याच धमक्यांचा संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटेपर्यंत बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या समोर जमले होते. मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी दिली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
RSS Mohan Bhagwat: आचरण विसरल्यामुळे आपली दुर्गती; स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता द्यावं लागेल; संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवतांचं आवाहन
आचरण विसरल्यामुळे आपली दुर्गती; स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता द्यावं लागेल; संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवतांचं आवाहन
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
Embed widget