एक्स्प्लोर

'Dam अभिनेत्री' म्हटल्यामुळे रेणुका शहाणेंनी घेतली ट्रोलरची शाळा, स्पेलिंग मिस्टेक सुधारत केली वाक्यात दुरूस्ती

एका ट्विटर युजरने अभिनेत्री रेणुका शहाणेंना 'डॅम अॅक्ट्रेस' म्हटलं आहे. त्यानंतर मात्र रेणुका शहाणेंनी या यूजरची शाळा घेतली. एवढचं नव्हे तर त्याला स्पेलिंग मिस्टेक समजावून सांगत त्याच्या वाक्यात दुरूस्तीही केली.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्वीटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्वीट केलं होतं आणि भाजपच्या आयटी सेलला शांत राहण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन करा, असं मोदींना सांगितलं होतं. रेणुका शहाणेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा एका ट्वीटमुळे एकदा रेणुका शहाणे चर्चेत आल्या आहेत. एका ट्विटर युजरने अभिनेत्री रेणुका शहाणेंना 'डॅम अॅक्ट्रेस' म्हटलं आहे. त्यानंतर मात्र रेणुका शहाणेंनी या यूजरची शाळा घेतली. यूजरने मंगळवारी म्हटलं की, 'रेणुका तू फक्त एक डॅम अॅक्ट्रेस आहेस.' त्यानंतर रेणुका शहाणेंनी यूजरची चूक सुधारत त्याला प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, dam (धरण) आणि damn (शुल्लक) या दोन शब्दांमधील अंतर त्याला समजावलं. रेणुका शहाणे यूजरच्या ट्वीटला उत्तर देताना म्हणाल्या की, 'तुला मला damn (शुल्लक) म्हणायचं आहे का?, कारण dam (धरण) नदीचा प्रवाह रोखण्याचं आणि वीजनिर्मीतीचं कण्यासाठी उपयोगी ठरतं. तुला मला हे dam (धरण) म्हणायचं नव्हतं, बरोबर ना? कारण माझी कितीही इच्छा असली तरीही ते मी होऊ शकत नाही. ते सजीव नसतात. शुल्लक (damn)! मग आता तरी मी तुझं वाक्य दुरुस्त करू शकते का? 'तू शुल्लक (damn)अभिनेत्री आहेस' हे योग्य वाक्य आहे! आणि मी आहे.' दरम्यान, रेणुका शहाणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटवर प्रतिक्रीया दिली होती. ज्यामध्ये मोदींनी सर्वांना हिंसक आंदोलनांपासून दूर राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या या ट्वीटला उत्तर देत रेणुका शहाणेंनी मोदींचं हे ट्वीट रिट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, "सर, तुम्ही कृपया तुमच्या (भाजप) सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचं आवाहन करा. जास्तीत जास्त अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांची जास्तीत जास्त माहिती खोटी आणि भ्रम पसरवणारी असते. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा." रेणुका शहाणेचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "देशात शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे." संबंधित बातम्या :  सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget