मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' मधील मच अवेटेड सॉन्ग 'मुन्ना बदनाम हुआ' लवरच रिलिज होणार आहे. परंतु, त्याआधी सलमान खानने या गाण्याची पहिली झलक शेअर केली आहे. 'दबंग' सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील आयटम सॉन्ग 'मुन्नी बदनाम' आणि 'फेविकोल से' ही दोन्ही गाणी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती.

'दबंग 3'मध्ये यावेळी असचं एक हटके गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने इन्स्टाग्रामवर याची खास झलक शेअर केली आहे. पोस्ट करताना सलमानने कॅप्शन दिलं आहे की, "आ रहे हैं बहुत जल्द सबसे बदमाश गाने मुन्ना बदनाम हुआ के साथ."


दरम्यान, 'दबंग 3' मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्यात सलमान खानसोबत वरीना हुसैन दिसून येत आहे. रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, या गाण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाही दिसू शकतात. हे गाणं 30 नोव्हेंबरला रिलिज होणार आहे.

'दबंग 3' चित्रपटाचा ट्रेलर याआधीच रिलिज करण्यात आला असून लोकांनी पसंतीही दर्शवली आहे. आता फॅन्स या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहेत. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे.

दरम्यान, या चित्रपटात सलमान खान आणि सई मांजरेकर व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे सेलिब्रिटी दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत. चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

"अपराजित अयोध्या" कंगनाकडून राम मंदिरावरील चित्रपटाची घोषणा

'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज