मुंबई : शिवरायांचा इतिहास वाचताना कोढाण्याच्या लढाईचं पान वगळता येत नाही. कोंढाणा स्वराज्यात आणण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरेंवरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्या चित्रपटातील मुख्य भूमिकांवरून पदडा उठवण्यात आला होता. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबात उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.


स्वराज्यात कोंढाणा आणण्याची जिजाऊ आणि शिवरायाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तानाजी मालुसरेंची कथा या ट्रेलरमधून उलगडत आहे. एवढच इतिहासाच्या पुस्तकातील तानाजी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ट्रेलरमधील संवाद दमदार आहेतच, पण अजय देवगणने साकारलेला तानाजीही प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे.

Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज

दरम्यान, 'तानाजी : द अनसंग वारियर' या चित्रपटात स्वतः अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर याव्यतिरिक्त सैफ अली खान राजपूत मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढच नाहीतर मराठी अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात काजोलही झळकणार असून ती तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.

पाहा 'तानाजी : द अनसंग वारियर' या चित्रपटाचा ट्रेलर :



अजय देवगण आणि भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम रावत यांनी केलं आहे. पुढिल वर्षी म्हणजे, 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि सैफ बऱ्याच वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत.