Pusha 2 Review: यावर्षातला जबरदस्त एंटरटेनर; फक्त फायर नाही, वाईल्ड फायर अल्लू अर्जुन
Pusha 2 Review: 'पुष्पा 2: द रुल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. कसा आहे पुष्पा 2, पाहावा की नाही, याचा रिव्ह्यू वाचा...
Sukumar
Allu Arjun Rashmika Mandhana Fahadh Faasil
Theaters
Pusha 2 Review: पहली एंट्री पर इतना बवाल नहीं करता जितना दूसरी एंट्री पर करता है, हे आम्ही नाही म्हणत, तर हा दस्तुरखुद्द पुष्पा राजचा डायलॉग आहे आणि पुष्पाच्या धडाकेबाज डायलॉगसारखाच हा चित्रपट आहे. पुष्पा फ्लावर नहीं फायर था, आणि यावेळी तो फक्त फायर नाहीतर वाईल्ड फायर निघालाय... 'पुष्पा 2: द रुल'मध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात आहे, ती म्हणजे, एन्टरटेन्मेंट... एन्टरटेन्मेंट... आणि एन्टरटेन्मेंट. पुष्पा 2 पाहताना तुमचं डोकं पुष्पाच्या वाईल्ड फायरच्या हवाली करा आणि अजिबात घाबरू नका, पुष्पा भाऊ तुमच्या डोक्याची वाट लावणार नाही, उलट 3 तास आणि 20 मिनिटांनी जेव्हा पिक्चर संपेल त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल, त्याची तोड कशाला नसेल. हा पण संपूर्ण चित्रपट पाहताना तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं अजिबात लॉजिक लावायचं नाही, फक्त आणि फक्त एन्टरटेन्मेंटचा आस्वाद घ्यायचा आहे. जर एखाद्या सिनेमानं तुम्हाला लॉजिक लावण्याची संधीच दिली नाही आणि त्यानं जर तुम्हाला 3 तासांपर्यंत खिळवून ठेवलं, तर समजून जा हा धमाल एन्टरटेनर सिनेमा आहे. अशा सिनेमाची प्रेक्षकांना खरं तर गरज असतेच...
चित्रपटाची पटकथा...
छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा पहिल्या पार्टमधला पुष्पा आता दुसऱ्या भागात रक्तचंदनाचा मोठा स्मगलर बनला आहे, तो संपूर्ण सिंडिकेटचा प्रमुख बनलाय. पण, आपल्या आयुष्यात जसं आपण पाहतो की, एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात जसजशी एक-एक पायरी वर चढते, तसतशी त्याच्या दुश्मनांमध्येही वाढ होते. पुष्पाच्या बाबतीतही तसंच काहीसं होतं. तो पुढे जातो, तसतसे पुष्पाचे दुश्मनही खूप वाढतात. पुष्पा त्याची पत्नी श्रीवल्लीचं सगळं ऐकतो, जेव्हा ती त्याला सांगते की, CM ला भेटायला जातोय, तर त्यांच्यासोबत एक फोटो काढशील. पण ज्यावेळी पुष्पा मुख्यमंत्र्यांना भेटतो, त्यावेळी मुख्यमंत्री एका स्मगलरसोबत फोटो काढायला नकार देतात. त्यावेळी मात्र पुष्पा थेट CM बदलण्याची प्लानिंग करतो. यासाठी पुष्पाला 5000 कोटींच्या रक्तचंदनाची परदेशात तस्करी करायची असते, पुढे काय होतं? अशातच पुष्पाचा दुश्मन इन्स्पेक्टर भंवर सिंह शेखावत काय करणार? सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन अभिनीत क्राईम थ्रीलर कसा रंगतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चित्रपटाबाबत थोडंसं...
'पुष्पा 2: द रुल' एक Mass एंटरटेनर आहे, प्रत्येक प्रेम एंटरटेनिंग आहे आणि चित्रपट पाहताना तुम्ही लॉजिकबाबत विचारच करत नाही... चित्रपटात जे जे पुष्पा करतो, त्यावर आपला विश्वास बसत जातो. एकापाठोपाठ एक असेल कमाल, धमाकेदार सीन्स येतात, काहीतर असे सीन्स आहे की, जिथे शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही. पुष्पाचा स्वॅग लभ भारीय... मध्ये एक सीन तर असा येतो, जिथे पुष्पा Sorry बोलतो, पण क्षणात मनात विचार येतो की, पुष्षा तो झुकता नही... पण पुढे जे घडतं ते धमाल आहे, खळबळ माजवणारं आहे... ही अशी फिल्म आहे जी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून घेऊन येतेय. चित्रपट 3 तास 20 मिनिटांचा आहे, पण वेळ कसा जातो, ते तुम्हाला कळतंच नाही. उलट संपल्यानंतर असं वाटतं की, आणखी काहीवेळ चालला असता तर मजा आली असती. पुष्पा म्हणजे फुल्ल टू पैसा वसूल... थिएटरमध्ये पाहण्यासारखा एक्सपीरियंस आहे. नक्की पाहा... कारण अशा चित्रपटांमुळेच सिनेमा जिवंत आहे. सिनेमामध्ये mass आणि class दोन्ही असेल, तर सिनेमा नक्की चालतो... असं म्हटलं जातं... आणि 'पुष्पा 2: द रुल' Mass आहे.
स्टारकास्टची अॅक्टिंग...
अल्लू अर्जुनची अॅक्टिंग धमाकेदार आहे, तो तुम्हाला विश्वासात घेतो आणि सांगतो की, जे तो करतोय, ते होऊ शकतं. त्याचा स्वॅग कमाल आहे... तो ज्या-ज्या फ्रेममध्ये आहे, तिथे तिथे तो सर्वांवर भारी पडलाय. 5 वर्षांची त्याची मेहनत स्पष्ट दिसतेय, अल्लू अर्जुननं हिरोगीरी आणि हिरोपंतीच्या व्याख्याच पुरत्या बदलल्या आहेत. त्यानं त्याचा परीघ वाढवला आहे. त्यानं साकारलेला पुष्पा आता खूपच भारी आहे. आता दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याला अल्लू अर्जुनचा स्वॅग मॅच करायचा असेल, तर काहीतरी खूपच मोठं करावं लागणार आहे. रश्मिकानं तर श्रीवल्लीची भूमिका पडद्यावर जीवंत केली आहे. अल्लू अर्जुन सारख्या हिरोसमोर नायिकेला आपलं कौशल्य फारसं दाखवायला मिळत नाही, रश्मिका अलगद चाहत्यांच्या मनात आपली छाप सोडते, फहाद फासिलनंही जबरदस्त काम केलं आहे, हिरो तेव्हाच मोठा होतो,जेव्हा त्याच्या समोर असलेल्या व्हिलनचा स्वॅग तितका भारी असतो. इथं फहादनं नेमकं तेच केलंय. एका पोलिसाच्या भूमिकेत फहादनं आपली छाप सोडली आहे. जगदीश प्रताप भंडारी, जगपत बाबू यांच्या भूमिकाही कमाल आहेत. सौरभ सचदेवानंही कमालीचं काम केलंय.
दिग्दर्शन आणि लेखन : सुकुमार यांची लेखन आणि दिग्दर्शन दोन्हींची तोड नाही... त्यांनी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. स्वॅग, एंटरटेन्मेंट... यामुळे त्यांचा जो मूळ उद्देश होता तो साध्य झाला. एकापाठोपाठ एक कमालीचे सीन्स आणि डायलॉग्समुळे पुष्पा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. प्रेक्षकांनाही हैराण करतो, खिळवून ठेवतो.
म्युझिक : 'पुष्पा 2: द रुल'ची पडती बाजू कोणती? तर या चित्रपटातील गाणी. अत्यंत वाईट आहेत, सामीसोडलं कोणतंच गाणं ऐकावसं वाटत नाही
एकंदरीत, हा चित्रपट पाहा आणि या वर्षाचा दणक्यात निरोप घ्या, तुम्हाला खरंच मजा येईल.