एक्स्प्लोर

GOAT Movie Review : विजयच्या दुहेरी भूमिकेतील मसालेदार मनोरंजक G.O.A.T.; वाचा रिव्ह्यू

GOAT Movie Review : विजयचा नवीन G.O.A.T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) ही असाच निखळ मनोरंजन करणारा तीन तासांचा मसालेदार चित्रपट आहे.

GOAT Movie Review : विजय दक्षिणेतील मोठा स्टार असून हिंदीमध्येही तो बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. त्याचे बहुतेक चित्रपट टिपिकल मसाला चित्रपट असतात जे अडीच तीन तास प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात चांगलेच यशस्वीही होतात. विजयचा नवीन G.O.A.T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) ही असाच निखळ मनोरंजन करणारा तीन तासांचा मसालेदार चित्रपट आहे. साऊथमध्ये हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत असून देशभरात काही ठिकाणी हिंदीतही रिलीज करण्यात आलेला आहे. विजयचा हा सेकंड लास्ट चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे विजयने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला असून तो लवकरच संपूर्णपणे राजकीय क्षेत्रात उतरणार आहे. G.O.A.T. नंतर त्याचा अजून एक चित्रपट येणार आहे.

एम. एस. गांधी (विजय) एक स्पेशेल अँटी टेररिस्ट स्क्वॉडचा सदस्य आहे. स्वतःच्या कुटुंबीयांपासून लपवून तो देश वाचवण्याचे काम करीत असतो. अशाच एका केनियातील मोहिमेत देशद्रोही वैज्ञानिक मेननचे कुटुंब मारले जाते. त्यानंतर थायलंडमधील एका मोहिमेत गांधीच्या कुटुंबावर हल्ला होता. यात त्याचा लहान मुलगा मारला जातो. परंतु काही वर्षानंतर रशियामध्ये विजयची त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या तरुणाशी भेट होते. तो त्याचा मुलगा जीवन (विजय) असतो. तो विजयला घेऊन घरी येतो, त्यानंतर मात्र गांधीच्या टीममधील एकेका सहकाऱ्याची हत्या होण्यास सुरुवात होते आणि एकामागोमाग एका रहस्यांचा उलगडा होत जातो.

दिग्दर्शक वेंकट प्रभूनेच चित्रपटाची कथा लिहिली आहे. अशा प्रकारची कथा आपण अनेक वेळा पाहिली आहे. बाप आणि मुलामधील संघर्ष त्याने एका वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण विजयच्या प्रेमात पडून म्हणा वा विजयची इमेज लक्षात घेऊन त्याने चित्रपट खूप लांबवला आहे. पण जवानचा दिग्दर्शक अॅटलीप्रमाणे त्याने चांगले काम केले आहे. फर्स्ट हाफ चांगलाच रंगतदार झाला असून सेकंड हाफही ठीकठाक आहे.

चित्रपटाचा क्लायमॅक्स आयपीएलमधील चेन्नई-मुंबई मॅचच्या पार्श्वभूमीवर आहे. असाच क्लायमॅक्स काही हॉलीवूडपटांचाही आहे. फुटबॉल स्टेडियमवर मॅच सुरु असताना नायक खलनायकाला कसा मारतो हे आपण हॉलिवूडपटात पाहिलेले आहे. पण वेंकट प्रभूने क्लायमॅक्स चांगला घेतला आहे.

विजयने एम.एस. गांधी आणि जीवन या दोन्ही भूमिका सफाईदारपणे साकारल्या आहेत. अॅक्शन सीनमध्ये विजयने कमाल केली आहे. अॅक्शन दृश्ये कमालीची झाली आहेत. बाकी कलाकारांमध्ये प्रभुदेवा, कोकल मोहन, जयराम सुब्रमण्यम, योगी बाबू, प्रशात त्यागराजन, स्नेहा प्रसन्न आणि मीनाक्षी चौधरीने आपले काम चोख बजावले आहे. दिवंगत अभिनेते विजयकांत यांना एआय तंत्रज्ञानाने जीवंत करण्यात आले आहे. चित्रपटाला संगीत युवान शंकर राजाने दिले आहे पण त्यात काही खास नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil On Vishal Patil  : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीकाSanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची  जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्यSharad Pawar Vs Ajit Pawar : महिला सुरक्षा सरकारचं प्राधान्य, पवारांच्या टीकेला दादांचं प्रत्युत्तरNarhari Zirwal : धनगडमधून आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाचा विरोध : झिरवाळ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Maharashtra Rain ALert: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Embed widget