Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


 


Aai Kuthe Kaay Karte Serial Updates : 'आई कुठं काय करते' मालिकेबाबत 'स्टार प्रवाह' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; मोठी अपडेट समोर



Aai Kuthe Kaay Karte Serial Updates :  स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या 'आई कुठं काय करते' या  मालिकेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही मालिका आता  प्रेक्षकांचा निरोप घेणार का, अशी चर्चा सुरू आहे. सध्या या मालिकेत काही ट्वीस्ट येत आहेत. मालिका संपण्याची चर्चा एका कारणाने सुरू झाली आहे. 'आई कुठं काय करते'या मालिकेच्या वेळेत नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...


Lakshmichya Pavalani: काय होणार जेव्हा नवरीच्या जागी कला दिसणार? लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत नवा ट्वीस्ट



Lakshmichya Pavalani: 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरु असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून अद्वैत आणि कलाच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. पण या मालिकेत एक मोठा ट्वीस्ट आता आलाय. कारण नयना आणि अद्वैतचं लग्न ठरलं असताना नयना लग्नाच्या दिवशी अद्वैत चांदेकरचा भाऊ राहुलसोबत पळून जाते. 


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Jau Bai Gavat Winner : शहरातल्या मुलीने जिंकलं गावचं मैदान; रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती


Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui : 'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi) 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वात रमशा फारुकीने बाजी मारली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत रमशा  फारुकी (Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui ) ही पहिल्या पर्वाची विजेती ठरली. तर, अंकिता मेस्त्री ही उपविजेती ठरली. प्रत्यक्षात गावात राहुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. अखेर अंतिम फेरीत पाच स्पर्धक राहिल्या. त्यानंतर अखेरच्या तीन स्पर्धकांमध्ये रमशा बाजी मारली.  


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Aaditya Narayan Viral Video : चाहत्याला मारलं, मोबाईल हिसकावून फेकला, कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायण चाहत्यावर भडकला; पाहा व्हिडिओ



Aaditya Narayan Viral Video :  बॉलीवूड अभिनेता आणि गायक आदित्य नारायण (Aaditya Narayan) याने त्याचे  वडिल उदित नारायण (Udit Narayan) गायकीच्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तसेच अनेक सिनेमांमधून  देखील तो झळकला आहे. अभिनेता आणि गायक अशी कामं करताना तो अनेकदा सूत्रसंचालनाची देखील भूमिका सांभाळतो. त्याच्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असणारा आदित्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर आदित्यचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय. 


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Star Pravah : 'स्टार प्रवाह'वर होणार दोन नव्या सदस्यांची एन्ट्री, 'हा' अभिनेता पुन्हा एकदा वाहिनीवर झळकणार?


Star Pravah New Actor : सध्या 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे. त्याचमुळे अनेक नवे सदस्य देखील स्टार प्रवाहच्या परिवारामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टमुळे स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची घोषणा केली होती. त्यामुळे येत्या काळात स्टार प्रवाह वाहिनीवर बरेच बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...


 


 Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना गरिबांचा अमिताभ बच्चन असे का म्हणतात? स्वत: डिस्को डान्सरने सांगितला किस्सा


Mithun Chakraborty :  मिथुन चक्रवर्ती  (Mithun Chakraborty) यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत स्वत: चे स्थान बळकट केले. मिथुनदा यांनी आपला डान्स, संवादफेकीची शैली यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मिथुन चक्रवर्ती यांना गरिबांचा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हटले जाते. काहींना हा विनोद वाटेल, पण हा किस्सा खरा (Why Mithun Chakraborty Called As Amitabh Bachchan Of Poor Peoples ) आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी याबाबतची माहिती एकदा दिली होती.  


बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा...