Ranveer Singh and Johnny Sins : पुरातनकाळात भारतात 'कामसूत्र' (Kamsutra) सारख्या ग्रंथाचे लिखाण झाले असले तरी लैगिंक संबंधाबाबत आजही उघडपणे भाष्य केले जात नाही. शरीरसंबंध, लैंगिक संबंधावर चर्चा करण्यास अनेकजण धजावत नाहीत. मात्र, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा अपवाद ठरला आहे. याआधी त्याने निरोधची जाहिरात केली होती. आता, त्याची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या जाहिरातीत रणवीर अॅडल्ट स्टार जॉनी सीन्ससोबत (Johnny Sins) झळकला आहे. ही जाहिरात पुरुषांच्या समस्येवर भाष्य करत आहे.
अभिनेता रणवीर सिंगने निरोध कंपनीसाठी बोल्ड जाहिरात केली. या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता. आता रणवीरची जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅडल्ट स्टार जॉनी सीन्ससोबत ही जाहिरात आहे.
जाहिरातीमध्ये काय?
रणवीर सिंगने ही जाहिरात इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. जाहिरातीमध्ये एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये द्विअर्थी संवाद आहेत. त्यातून ही जाहिरात पुरुषांच्या लैंगिक समस्येबाबत भाष्य करताना दिसत आहे.
जाहिरातीमध्ये गंभीर विषय पण फार विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. . ‘बोल्ड केअर’ या ब्रॅंडसाठी रणवीर आणि जॉनी सीन्स यांनी मिळून ही जाहिरात केली आहे. पुरूषांच्या लैंगिक समस्येवर हे प्रोडक्ट असल्याचे जाहिरातीतून दिसते.
जॉनीची पहिली भारतीय जाहिरात
जॉनी सीन्सची ही पहिली भारतीय जाहिरात ठरली आहे. जॉनी सीन्स हा अॅडल्ट स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. जॉनी सीन्सने प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामच्या शोमध्ये हजेरी लावली होती. आता जॉनीने भारतीय जाहिरातीमध्ये काम केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.