Rinku Dhawan Financial Crisis : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री रिंकू धवन (Rinku Dhawan) घराघरांत पोहोचली. रिंकूचं लग्न अभिनेता किरण करमारकरसोबत झालं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2017 मध्ये ते विभक्त झाले. 15 वर्षांच्या संसारानंतर ते वेगळे झाले. किरणपासून वेगळं झाल्यानंतर रिंकूच्या आयुष्यात अनेक उतार आले.


जेव्हा रिंकूकडे काम नव्हतं...


रिंकू धवन वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक पातळीवरदेखील संघर्ष करत होती. रिंकूच्या हातात काहीही काम नव्हतं. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने याबद्दल भाष्य केलं आहे. रिंकू म्हणाली,"जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा आता आपल्या आयुष्यात काहीही उरलं नाही असं वाटू लागतं. घटस्फोटानंतर अनेक दिवस माझ्याकडे काम नव्हतं. त्यावेळी माझ्या आयुष्यात वाईट दिवस सुरू होते". 


रिंकूच्या अकाऊंटमध्ये 10 रुपयेही नव्हते


रिंकू धवन पुढे म्हणाली,"आयुष्यात एकेकाळी माझ्या खिशात आणि अकाऊंटमध्ये 10 रुपयेही नव्हते. त्यावेळी माझ्या खांद्यावर मुलांची आणि पालकांची जबाबदारी होती. जेवण बनवण्यासाठीही माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. 17 वर्षे मी अभिनयाव्यतिरिक्त काहीही काम केलं नव्हतं. खूप वाईट दिवस सुरू होते. त्यानंतर मी कर्जबाजारी झाले. पण हिंमत सोडली नाही. माझं कुटुंब नेहमीच माझ्यासोबत होतं".






रिंकू धवन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. 'कहानी घर घर की' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. पुढे सलमान खानच्या 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात ती झळकली. 'बिग बॉस 17' फेम रिंकू 2015 मध्ये 'ये वादा रहा' या मालिकेत झळकली. 2000 मध्ये 'कहानी घर घर की' व्यतिरिक्त रिंकू 2012 मध्ये तुम ना मैंने कुछ कहा, 2020 मध्ये गुप्ता ब्रदर्स, 2022 मध्ये अप्पनपन आणि 2023 मध्ये तितली सारख्या मालिकांमध्ये दिसली. तसेच काही बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. रिंकूचा 2017 मध्ये हम दीवान दिल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अरमान जैन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होता. 2019 मध्ये ती वीरगती चित्रपटात झळकली.


संबंधित बातम्या


Box Office Movies : शाहरुख, सलमान आणि आमिर खानचे 'हे' चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाडणार पैशांचा पाऊस; तिन्ही खान धमाका करण्यास सज्ज!