Vadh Review: खून आणि वध (Vadh) यात काय फरक आहे? या दोन्ही गोष्टी एकच आहेत, असं काहींचं मत असेल पण असं नाहीये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा हा चित्रपट पाहून समजेल. 'वध' हा एक उत्तम चित्रपट (Movie) आहे, जो बघताना तुमची नजर थिएटरच्या स्क्रिनवरुन हटणार नाही. चित्रपटातील ट्विस्ट आणि टर्न तुम्हाला अश्चर्यचकित करतील.
चित्रपटाचे कथनाक
संजय मिश्रा यांनी शंभूनाथ मिश्रा या सेवानिवृत्त शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ग्वाल्हेरमध्ये ते आपली पत्नी मंजू मिश्रा यांच्यासोबत राहतात. मंजू मिश्रा यांची भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली आहे. शंभूनाथ मिश्रा आणि मंजू मिश्रा यांनी मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेले असते. त्यांचा मुलगा परदेशात स्थायिक झालेला असतो. त्यांच्या मुलाकडे बोलायलाही वेळ नसतो. ज्यांच्याकडून शंभूनाथ मिश्रा यांनी कर्ज घेतलेले असते, तो व्यक्ती शंभूनाथ आणि मंजू यांना त्रास देतो. त्यानंतर चित्रपटाच्या कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येतात. गुंडांसमोर बोलू न शकणारा वृद्ध व्यक्ती कसा खून करतो? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. ही कथा अनेक वृद्ध पालकांच्या वेदना दर्शवते जे मुले त्यांच्यापासून दूर राहतात.
अभिनय
संजय मिश्रा यांनी या चित्रपटामध्ये अप्रतिम काम केले आहे. त्यांनी शंभूनाथ मिश्रा ही भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. त्यांचे हावभाव तुम्हाला थक्क करतील. संजय मिश्रा यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे, असं म्हणता येईल. नीना गुप्ता यांनीही चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. सौरभ सचदेवा यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. पोलिसाची भूमिका साकारणारा मानव विज देखील प्रेक्षकांची मनं जिंकतो. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता.
कसा आहे चित्रपट?
चित्रपटाची सुरुवात जरा संथ वाटते. चित्रपटाचा सेकंड हाफ हा खूप चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एकामागून एक ट्विस्ट येतात. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जसपाल सिंह संधू आणि राजीव बर्नवाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावा.
वाचा इतर रिव्ह्यू:
Bhediya Review: हॉरर अन् कॉमेडीचा तडका; कसा आहे वरुण आणि क्रितीचा भेडिया? वाचा रिव्ह्यू