Bhediya Reviewभेडिया (Bhediya) हा चित्रपट राहुल रॉय यांच्या चित्रपटाची कॉपी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत होता. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक लोक भेडियाचा ट्रेलरमधील वापरण्यात आलेले वीएफएक्स हे आदिपुरुषच्या (Adipurush) टीझरपेक्षा चांगले आहेत, असं म्हणत होते. आता हा चित्रपट कसा आहे? या चित्रपटात काय नवं दाखवण्यात आलं आहे? याबाबत जाणून घेऊयात...


चित्रपटाचं कथानक
या चित्रपटाचं कथानक हे एका अशा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याला जंगलामधील झाडं कापण्याचा एक प्रोजेक्ट देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये हा व्यक्ती राहात असतो या व्यक्तीची भूमिका अभिनेता वरुण धवननं (Varun Dhawan) साकारली आहे. चित्रपटात वरुण हा अचानक इच्छाधारी लांडगा म्हणजेच भेडिया होतो.  भेडिया होऊन वरुण काही खास लोकांचा जीव घेतो. हे लोक कोण आहेत? हे पाहण्यासाठी तुम्हाला भेडिया हा चित्रपट बघावा लागेल.  


कलाकारांचा अभिनय 
वरुणनं या चित्रपटात भास्कर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. वरुणचा या चित्रपटातील अभिनय मन जिंकतो. या चित्रपटातील कॉमेडी आणि गंभीर सिन्समध्ये देखील वरुणनं चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. क्रितीनं (kriti sanon) या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. क्रितीचा या चित्रपटातील रोल हा छोटा महत्वाचा नाही, असं तुम्हाला सुरुवातीला वाटू शकतं पण चित्रपटाच्या क्लायमॅक्सला क्रितीच्या भूमिकेनं जो ट्वीस्ट आणला आहे, तो तुम्हाला थक्क करेल. अभिषेक बॅनर्जीचा (Abhishek Banerjee) या चित्रपटातील कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव तसेच त्याचा हटके अंदाज प्रेक्षकांना खळखळून हासवतो. पॉलिन कबाक यांन देखील चित्रपटात चांगलं काम केलं आहे. 


चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका तडका आहे. हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुमचे मनोरंजन करतो. चित्रपटात वापरण्यात आलेले वीएफएक्स देखील चांगले आहेत. चित्रपटात अरुणाचलमधील निसर्ग सौंदर्य बघायला मिळते. या चित्रपटातील म्युझिक चांगलं आहे. तसेच चित्रपटाची कथा देखील चांगली आहे. हा चित्रपट 3Dमध्ये तुम्ही पाहू शकता. अमर कौशिक (Amar Kaushik) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम पद्धतीनं केलं आहे. तसेच चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. 


वाचा इतर चित्रपटांचे रिव्ह्यू:


Thank God Review: पाप आणि पुण्याचा हिशोब करणारा चित्रपट; कसा आहे अजय देवगणचा 'थँक गॉड'? वाचा