Akshay Kumar:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आता त्याच्या नव्या फॅशन ब्रँडची घोषणा केली आहे. या ब्रँडचं नाव फोर्सनाइन असं आहे. अक्षयनं नुकताच एक खास व्हिडीओ शेअर करुन त्याच्या या नव्या ब्रँडची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओमध्ये अक्षयचं आलिशान घर देखील दिसत आहे. अक्षयनं व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील वॉर्डरोब देखील आहे. 

Continues below advertisement


अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'फोर्सनाइन हा माझा लवकरच लाँच होणारा ब्रँड आहे. या ब्रँडला आम्ही मनापासून तयार केलं आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून ब्रँडबाबत अधिक माहिती देत आहे.' व्हिडीओमध्ये अक्षयनं या ब्रँडच्या नावाबद्दल देखील सांगितलं, 'माझ्या घरात दिलेली माझी  ही पहिली मुलाखत. माझ्या माझे वडिल आर्म फोर्समध्ये होते आणि नऊ नंबर हा माझ्यासाठी लकी आहे. कारण नऊ तारखेला माझा वाढदिवस असतो. त्यामुळे मी या ब्रँडला फोर्सनाइन असं नाव दिलं आहे. ' या व्हिडीओमध्ये अक्षयनं त्याचा वॉर्डरोब दाखवला.


अक्षयच्या व्हिडीओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अक्षयच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सर, खूप छान घर आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'हा ब्रँड कधी लाँच होणार आहे?' 


पाहा व्हिडीओ: 



अक्षयचे आगामी चित्रपट


अक्षयचा मै खिलाडी तू आनाडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तो वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात देखील काम करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 8 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!