Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आमिरनं त्याच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले. यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) यांनी आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये झालेल्या पूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 


आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन यानं सोशल मीडियावर आमिर आणि किरणचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर हा कलश पूजन करताना दिसत आहे तर किरण ही आरती करताना दिसत आहे. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक केलं असून काहींनी फोटोला कमेंट्स देखील केल्या आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अद्वैत चंदन शेअर केलेल्या फोटोला काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे खूप छान फोटो आहेत, शेअर केल्याबद्दल धन्यवाद' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'आमिरला असं पाहून मी आश्चर्यचकित झालो. हे हृदयस्पर्शी क्षण आहेत.' अद्वैतनं शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर हा  डोक्यावर टोपी, चष्मा, ब्यू डेनिम आणि जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे. 


पाहा फोटो 










आमिरचे चित्रपट 


काही महिन्यांपूूर्वी आमिरचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. या चित्रपटात आमिरसोबतच करिना कपूर, मोना सिंह आणि नागा चैतन्य यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता आमिरचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 8 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!