एक्स्प्लोर

Hawahawai Review: हवाहवाई : "सामान्य गृहिणीचा असामान्य प्रवास"

स्ट्रीट फूड सर्व्हिस देणाऱ्या अशाच निराळ्या माणसांचं साधं जगणं मांडणारा "हवाहवाई" हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय.

Hawahawai Review: चित्रपट म्हटलं की मनोरंजन हे ओघाने येतंच! त्यात मराठी चित्रपट तर आता केवळ विनोदी मनोरंजन करण्यापूरतेच उरलेत की काय असा बरेचदा समज होतो. पण तरीही काही चित्रपट फक्त मनोरंजन न करता सामाजिक प्रश्नांना फारच तरलतेने स्पर्श करतात. विषयाची, अभिनयाची, संगीताची आणि संघर्षाची तरलता ज्या चित्रपटाला लाभते ते चित्रपट निराळे ठरतात. स्ट्रीट फूड सर्व्हिस देणाऱ्या अशाच निराळ्या माणसांचं साधं जगणं मांडणारा "हवाहवाई" हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय.

दि ग्रेट इंडियन किचनची नायिका असणाऱ्या 'निमिषा सजयन' चा हा पहिलाच मराठी चित्रपट! महाराष्ट्रीयन पेहरावात आणि मराठी भाषेच्या माध्यमातून नायिकेने जबरदस्त एन्ट्री केलीय, असंच म्हणावं लागेल. निमिषा बरोबरच वर्षा उसगावकर यांनी देखील त्यांच्या व्यक्तिरेखेला साजेशी भूमिका निभावली आहे. मध्यमवर्गीय समंजस स्त्रियां या सहनशील असतात असा गोंडा आपण नेहमी घोळवत असतो पण यातील काही स्त्रिया प्रेम या भावनेकडे किती प्रगल्भतेने बघतात हे मात्र हा चित्रपट बघितल्यावर समजते. आयुष्यात माणसाने सुखं शोधावीत पण तुम्हाला समाधानी ठेवणारा प्रेम नावाचा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. हा प्रेमाचा फॅक्टर एकदा का स्त्रीच्या डोक्यात स्पष्ट बसला की तोच तिच्यासाठी सर्वस्व ठरतो. नवऱ्याच्या जेमतेम पगारात खाऊन पिऊन घर सुखी ठेवणारी गृहिणी जर समाधानी असेल तर कुटुंब कोणत्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढत टिकून राहतं. हा आता स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा कधी कधी परिस्थितीमुळे मारल्या जातात पण चित्रपट कुठेही त्याचं भांडवल करत नाही.

चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन कसे असते हे दाखविताना... ते जीवन जगत असताना कितीही संघर्ष वाट्याला आला तरी त्यातून आनंदी आयुष्य कसं जगता येईल हे पावलोपावली हा चित्रपट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. ती सकारात्मक ऊर्जा चित्रपटाचा प्राण आहे.

चित्रपटाची कथा अतिशय रंजक पद्धतीने अगदी योग्य वेगात पुढे पुढे सरकते. फार अनपेक्षित असा धक्का देत रस्त्यावर राहणारा माणूस एकदम करोडोंचा मालक होतो. हा ठराविक साचा या चित्रपटाने नाकारला आहे. या चमत्कृती तंत्राला धक्का देत चित्रपट वास्तवतेचा खुला शेवट देतो त्यामुळेच तो आपलासा वाटतो.

चित्रपटाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांचं लक्ष तसूभरही विचलित न होऊ देता त्यांना कथेत गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झालाय.चित्रपटाच्या सुंदर आशयाच्या जोडीलाच आशाताईंच्या गोड आवाजाची, पंकज पडघम यांच्या सुरेख संगीताची, सिद्धार्थ जाधव, समीर चौगुले, गौरव मोरे सारख्या निखळ विनोदी चेहऱ्यांची, मध्यमवर्गीय विचारधारेची, चटपटीत संवादाची अन् महेश टिळेकरांच्या दमदार दिग्दर्शनाची भक्कम जोड आहेच.

प्रचंड स्वाभिमानी, मेहनती आणि कुटुंबवत्सल गृहिणी असणाऱ्या या नायिकेच्या जिद्दीच्या, स्वप्नांच्या मुळाशी आहे तो ममत्वभाव! नवऱ्यावरील प्रेम आणि मुलांवरचं वात्सल्य... एक मुलगी, बायको, आई आणि मैत्रीण या सर्वच नात्यातून आपल्यासमोर येणारी ही हवाहवाई म्हणजे नेमकी कोण ? हे समजण्यासाठी आपल्या कुटूंबासोबत सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. पैसा वसूल असा हा उत्कृष्ट कौटुंबिक मराठी चित्रपट हवाहवाई.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Goodbye Movie Review : कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा 'गुडबाय'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget