LIVE UPDATE | विरारमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये मोठी कारवाई, तब्बल एक कोटींची रोकड जप्त, पाचपावलीतून 75 लाख तर सीताबर्डीतून 25 लाख हस्तगत
2. भाजपच्या संकल्पपत्राचं आज प्रकाशन तर नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत, तर भाजपचे दिग्गज नेतेही प्रचारात
3. उद्धव ठाकरे आज इस्लामपूर, कोल्हापूरमध्ये तर आदित्य ठाकरेंचे मुंबईत रोड शो, शरद पवारांचा सोलापूर, सांगली आणि पुण्यात दौरा
4. अयोध्या प्रकरणातील सुनावणीचे शेवटचे तीन दिवस, मुस्लीम पक्षाच्या युक्तिवादाला हिंदू पक्ष उत्तर देणार, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
5. 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कर भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी, इस्थर डफलो आणि मायकल क्रेमर यांना जाहीर, दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात केलेल्या संशोधनासाठी गौरव
6. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती निश्चित, तर अमित शाहांचे पुत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी, राजीव शुक्लांची घोषणा