LIVE- महाराष्ट्र बंद मागे घेतो : प्रकाश आंबेडकर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.
कांजूरमार्ग येथे दोन वेळा रेल रोको केल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश. आता मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येण्य़ास सुरुवात. पश्चिम आणि हार्बर रेल्वे देखील हळूहळू पूर्वपदावर, सध्या रेल्वे वाहतूक कुठेही बंद नाही
तब्बल तीन तासांनंतर मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्टेशनवरची वाहतूक सुरु, दोन्ही दिशेच्या एक एक ट्रेन रवाना
कोकणातून मुंबई, ठाण्याकडे येणाऱ्या एसटी बसेस पेण तालुक्यातील रामवाडी एसटी आगारात थांबवण्यात आल्या
मुंबईतील मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन मधील चित्रपटांचे खेळ रद्द, फिल्म सिटीमधील रस्ते आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने हिंदी मालिकांचे शूटिंगही रद्द, शिवाजी मंदिर येथे होणारा ढाई अक्षर प्रेम के या नाटकाचा शो रद्द
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
नवी मुंबई : सायन-पनवेल हायवेवर कळंबोली इथे रास्ता रोको, दोन्ही मार्गावर वाहतूक खोळंबली
दादर स्टेशनवर आंदोलक आक्रमक, मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन रेलरेको, वाहतुकीवर परिणाम
ठाणे स्टेशनजवळ ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी गाड्या अडवल्या, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर पनवेल येथे रास्ता रोको. वाहतूक पूर्णपणे ठप्प.
मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द नाही, विद्यार्थ्यांना एक तास उशिरा येण्याची मुभा
घाटकोपर ते एअरपोर्ट स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम, 15 मिनिटांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता, एअरपोर्ट ते वर्सोवा स्टेशनची वाहतूक सुरळीत
मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाईनगर इथे आंदोलक रस्त्यावर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम
मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाईनगर इथे आंदोलक रस्त्यावर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम
नागपुरात शताब्दी चौक आणि जयताळा परिसरात रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्याचा प्रयत्न, पोलिस घटनास्थळी दाखल
मुंबई विद्यापीठाच्या आज एकूण 13 परीक्षा आहेत, मात्र अद्याप परीक्षांबाबत कोणताही निर्णय मुंबई विद्यपीठने घेललेला नाही.
लॉ च्या परीक्षा दुपारच्या सत्रात आहेत. मात्र, परीक्षा लांबणीवर अथवा परीक्षेला सुट्टी असं परिपत्रक अद्याप निघालेलं नाही.
बुलडाणा एसटी बसेस बंद, बस स्थानकावर पोलिस बंदोबस्त
बेळगावहून महाराष्ट्रातील शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या
राज्यातील परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून लोकसभेत निवेदन होण्याची शक्यता, हंसराज अहिर निवेदन देण्याची शक्यता, राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्र्यांची काल फोनवरुन बातचित
वसईत एसटी आणि महापालिकेची परिवहन सेवा बंद, रिक्षासेवाही बंद
पुणे शहरात शांतता, दुकानं, मॉल बंद, बहुतांश शाळांना सुट्टी, रस्त्यावर वाहतूकही कमी
औरंगाबादमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त, 3000 हजार पोलिस रस्त्यावर, राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात
#महाराष्ट्रबंद – सांगलीत सकाळी 7 नंतर एसटी सेवा बंद, बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मुंबईतील गोरेगाव स्थानकावर अडवलेल्या गाड्या रवाना, वाहतूक सुरळीत
आज शासकीय सुट्टी नाही, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसटी बस सेवा बंद
विरार स्टेशनवर दहा मिनिटांसाठी अडवलेली ट्रेन रवाना, आंदोलकांना हटवलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
#महाराष्ट्रबंद - मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द, आजच्या पेपरची पुढील तारीख लवकरच जाहीर करणार
#महाराष्ट्रबंद - मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द, आजच्या पेपरची पुढील तारीख लवकरच जाहीर करणार
#महाराष्ट्रबंद - मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द, आजच्या पेपरची पुढील तारीख लवकरच जाहीर करणार
अहमदनगर जिल्ह्यातील 11 एसटी आगारांची वाहतूक बंद, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी, तारकपूर, श्रीगोंदासह अनेक आगारातील एसटी वाहतूक ठप्प, विभाग नियंत्रकांची माहिती
विरार:- महाराष्ट्र बंदसाठी वसई तालुक्यामध्ये आंबेडकरी जनता रस्त्यावर, विरार पूर्व मनवेल पाडा तलावाजवळ विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटना एकत्र आल्या आहेत. आज सकाळी 7 वाजल्या पासूनच या संघटना एकत्र येऊन विरार शहरातील रस्ते बंद करत आहेत.

विरार पश्चिम, पूर्व परिसरात कार्यकर्ते जागोजागी एकत्र आल्याने काही शाळाही बंद ठेवण्यात आल्याचे शाळांकडून पालकांना सांगितले आहे. तर सकाळी कामावर जाणाऱ्या वेळेतच रिक्षा बंद केल्याने चाकारामान्यांची पायपीट होत आहे. नालासोपारा आणि वसई मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
नाशिक : महाराष्ट्र बंदमुळे सटाणा बस डेपोने सर्व बस बंद ठेवल्या
#महाराष्ट्रबंद –
ठाणे - ट्रॅफिकवर परिणाम, टीएमटी बसेस, रिक्षा अडविल्या, तीन हात नाक्यावर वाहनं अडवण्यास सुरुवात
ठाण्यात जमावबंदीचे आदेश
ठाण्यात जमावबंदीचे आदेश
ठाण्यात जमावबंदीचे आदेश
अकोला : #महाराष्ट्रबंद च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नाशिक : #महाराष्ट्रबंद ला पाठिंबा म्हणून लासलगाव बाजार समितीत दुपारी 12 वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव बंद
नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये नेहमीप्रमाणे आवक, भाजीपाल्याच्या 550 गाड्या दाखल
मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद, महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखण्याचं डबेवाल्यांचं आवाहन
औरंगाबाद- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एमबीए, एमए आणि प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ.दिगंबर नेटके यांची माहिती

➡️ एमएचा पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि एमबीएचा अकाऊंटिंग फॉर मॅनेजर पेपर पुढे ढकलला
रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचा #महाराष्ट्रबंद ला पाठिंबा

➡️ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सुमारे सव्वा लाख रिक्षा, 10 हजार टॅक्सी धावणार नाहीत

➡️कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षा बंद

➡️लाल बावटा रिक्षा संघटनाही बंदमध्ये सहभागी
रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचा #महाराष्ट्रबंद ला पाठिंबा

➡️ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सुमारे सव्वा लाख रिक्षा, 10 हजार टॅक्सी धावणार नाहीत

➡️कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षा बंद

➡️लाल बावटा रिक्षा संघटनाही बंदमध्ये सहभागी
स्कूल बस बंद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशन घेतला आहे. बंदच्या काळात एखादी अनुचित घटना घडू शकते त्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं स्कूल बस चालवण्यात येणार नसल्याचं स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
पुण्यातील भीमा कोरेगाव इथे झालेल्या दगडफेकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या घटनेची विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तिथे जाऊन आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा.

लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे."
सखोल चौकशी करा : रामदास आठवले
गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. पण ही पहिलीच वेळ आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी शांतात ठेवावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करुन तुटून पडत आहेत, हे दृश्य कोणालाही न आवडणारं आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.