LIVE BLOG : आंबेगाव भिंत दुर्घटनेप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुण्यातील आंबेगावमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अखेर सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jul 2019 09:23 PM
मुंबईत झालेल्या जोरदार पावसात संरक्षक भिंत कोसळून आणखी एकाचा मृत्यू, सोमवारी मध्यरात्री मुलुंड पश्चिम येथील मॉडेल टाऊनमध्ये असलेल्या फाल्गुनी सोसायटीची संरक्षण भिंत पावसाच्या तडाख्यामुळे पडल्याने भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झालेल्या इमारतीच्या वॉचमनचा मृत्यू
पुणे : आंबेगाव दुर्घटनेप्रकरणी अखेर सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, जागा मालक, इमारत विकासक, कॉन्ट्रॅक्टर, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वेणूताई चव्हाण, तंत्रनिकेतनचे व्यवस्थापक आणि बांधकाम विभागाचे कामकाज पाहणारे अधिकारी यांच्यावर गुन्हा
निवडणूक आयोगाला सांगून व्होटिंग कार्ड आधार कार्डला जोडू, बोगस कार्ड रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं स्वतः पाठपुरावा करण्याचं आश्वासन, कोणाची मतं कमी होतील मला सांगायची गरज नाही, फडणवीसांचा टोला
मुंबई : तब्बल 16 तासांनंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु, सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांचा हायकोर्टात जामिनासाठी अर्ज, 4 जुलैला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, डॉ.भक्ती मेहरे, डॉ.हेमा अहुजा आणि डॉ.अंकिता खंडेलवालवर डॉ.पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, आरोपी तपासकार्यात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा
#WorldCup2019 भारत वि. बांगलादेश सामना, नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी, केदार जाधव आणि कुलदीप यादवला विश्रांती
मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्णपणे ठप्प, चुनाभट्टी स्टेशनवर रुळावर पाणी
पुणे : पुढील 48 तास महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई आणि उपनगरांमध्येही मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज, पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी पर्यटनस्थळी न जाण्याचं आवाहन
मुंबई : मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून चार विशेष ट्रेन्स रवाना, कल्याण, टिटवाळा, कर्जत आणि बदलापूरसाठी टेन्स रवाना
मुंबई : मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले, जखमींचे उपचार आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेणार, मुख्यमंत्र्यांचा घोषणा
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक लवकरच सुरु होईल, सध्या ठाणे-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी सेवा ठप्प
मुंबई : मालाड सबवे येथे पाण्यात स्कॉर्पिओ गाडी अडकल्याने दोघांचा मृत्यू, पाण्यात गुदमरुन दोघांचा मृत्यू
नांदेड : शेतात काम करतांना विजेची तार अंगावर पडल्याने शॉक लागून दोन सख्या भावांचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील घटना, रमेश पाटील आणि मंगेश पाटील अशी मृतांची नावे
मुंबई : मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, मुसळधार पावसाचा फटका, बचावकार्य सुरु

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश, एक महिला गंभीर जखमी
मुंबई : सायन रेल्वे स्टेशनवर रुळांवर पाणी साचलं




मुंबई : सायन रेल्वे स्टेशनवर रुळांवर पाणी साचलं




मुंबई विमानतळ : स्पाइसजेट एसजी 6237 जयपूर-मुंबई फ्लाईट उतरताना रनवेबाहेर गेल्याने विमानाचा अपघात, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, प्रवाशांना दुखापत नाही
ठाणे: जोरदार पावसामुळे आज अनेक उपनगरीय रेल्वे ठप्प असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आरपीएफकडून नाश्त्याची सोय



कल्याण: मुसळधार पावसामुळे कल्याणमधील शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश
मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा



मुंबई आणि नवी मुंबईत सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयासंह शासकीय कार्यालयांना सुट्टी, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत



मुंबई : मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणाचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु, आणखी काही लोक अडकल्याची भिती



पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळली, दुर्घटनेत 6 मजूरांचा जागीच मृत्यू, आणखी मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता



पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणाचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु, आणखी काही लोक अडकल्याची भिती

2. पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळली, दुर्घटनेत 6 मजूरांचा जागीच मृत्यू, आणखी मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

3. मुंबई, नवी मुंबई सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयासंह शासकीय कार्यालय बंद, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत

4. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान घसरले, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली, सर्व 167 प्रवासी सुखरुप

5. पुढचे 4 दिवस मुंबईसह कोकणात अतिवृष्टी, तर मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार बरसणार, हवामान विभागाची माहिती, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

6. नाशकालाही पावसानं झोडपलं, शहरी भागात ट्रॅफिक जॅम, पालघरमध्ये सूर्या आणि वैतरणाला पूर तर लोणावळ्यातलं भुशी डॅम ओव्हरफ्लो

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.