Sanjay Rathod On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी आजही चांगले संबंध,त्यांचे आजही फोन येतात

Sanjay Rathod On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी आजही चांगले संबंध,त्यांचे आजही फोन येतात

 मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास, पण मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाही मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये केले. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत हे वक्तव्य केले. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात असेही संजय राठोड पुढे बोलताना म्हणाले. भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारले असता मात्र त्यांनी घुमजाव केला. मी असे बोललोच नाही असे राठोड म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola