लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

देवदर्शनाच्या रांगेत उभे राहा किंवा रेशन दुकानाच्या रांगेत उभे राहा, अनेकदा रांगेत उभं राहिल्यानंतर शेजाऱ्यांसोबत वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Tuljapur devotee clash darshan rang

1/8
देवदर्शनाच्या रांगेत उभे राहा किंवा रेशन दुकानाच्या रांगेत उभे राहा, अनेकदा रांगेत उभं राहिल्यानंतर शेजाऱ्यांसोबत वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
2/8
तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दर्शन रांगेत उभा राहिलेल्या भक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3/8
रांगेत कुटुंबीयांसमवेत उभे असलेल्या लहान मुलाने उलटी केल्याच्या कारणावरून महिला व पुरुषांत ही फ्री स्टाईल हाणामारी झाली
4/8
या घटनेनंतर 15 ते 20 मिनिटं दोन कुटुंबात वाद सुरू होता,त्यावेळी रांगेतील इतर भाविकांनी भांडण सोडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला
5/8
रांगेतील भाविकांनाही हा वाद मिटेना गेल्यानंतर 20 मिनिटानी दर्शन रांगेचे नियोजन करणारे सिक्युरिटी गार्ड घटनास्थळी दाखल झाले.
6/8
तुळजाभवानी मंदिरात रविवार सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती, याशिवाय शाळांच्या सुट्टीचा हा शेवटचा आठवडा असल्यानेही भाविकांनी गर्दी केली आहे.
7/8
दरम्यान, दर्शन रांगेतील काही ठिकाणचे फॅन बंद पडले आहेत. गर्दी व उकाडा सुरू असल्याने भाविकांमध्ये वाद वाढत आहेत.
8/8
प्रशासनाकडून दर्शन रांगेच्या नियोजनात चूक होत असल्याचा आरोपही भाविकांकडून होत आहे.
Sponsored Links by Taboola