LIVE BLOG : अरविंद सावंतांच्या उमेदवारीवरुन मिलिंद देवरांचं टीकास्त्र

Background
1. लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणीतून, तर अमित शाह गांधीनगरमधून रिंगणात, लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कापला
2. नागपुरातून नितीन गडकरींच्या नावाची घोषणा, तर नगरमध्ये दिलीप गांधींचं तिकीट कापत सुजय विखेंना संधी, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारेंना उमेदवारी
3. नालासोपारा बॉम्बब्लास्ट प्रकरणातील वैभव राऊतचं समर्थन केल्यानं सिंधुदुर्गचे काँग्रेस उमेदवार वादात, जितेंद्र आव्हाडांकडून उमेदवारी रद्द करण्याची मागणी
4. सांगलीचे प्रतिक पाटील आणि इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्येच राहणार, भाजप प्रवेशाच्या चर्चेला दोन्ही पाटलांकडून पूर्णविराम
5. विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यातल्या काही भागांना गारपिठीचा तडाखा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि नांदेड जिल्ह्यातील गावांचं नुकसान, उभी पिकं आडवी
6. बारामुल्ला, बांदीपुरामध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश























