LIVE BLOG | श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती

Background
1. राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेला सरकारचा आठकाठीचा प्रयत्न, महापालिका आणि निवडणूक आयोगाची सभेला अद्याप परवानगी नाही,
2. तिसऱ्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस, एकूण 14 जागांसाठी मतदान,
3. प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्यानं अमरावतीत वृद्धाला मारहाण, आंबेडकरांकडून घटनेचा निषेध, मात्र बदनामी करणाऱ्यांना सबुरीचा सल्ला
4. निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर साध्वीला आज उत्तर द्यावं लागणार, शहीद हेमंत करकरेंबद्ददलचं वादग्रस्त विधान, साध्वीला पश्चाताप नाहीच
5. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेला सोबत घेणार, मुख्यमंत्र्यांचा एबीपी माझावर दावा, लोकसभेत राज ठाकरेंमुळं फरक पडणार नसल्याचा विश्वास
6. पंतप्रधान मोदींवरील सिनेमापाठोपाठ वेब सीरीजलाही बंदी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय, ईरॉस नॉऊवरील स्ट्रिमिंग थांबवलं


















