LIVE BLOG : न्यूझीलंडमधील मशीदीत झालेल्या गोळीबारात 7 भारतीयांचा मृत्यू

Background
राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. सहा जणांचा जीव घेणारा सीएसएमटी पूल भुईसपाट, तर मुंबईतल्या इतर पुलांचीही दुरुस्ती करण्याची मागणी
2. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर कारवाई, कंपनी काळ्या यादीत तर ठेकेदाराविरोधात गुन्हा, पालिका आयुक्तांच्या अटकेची मागणी
3. मुंबईकरांच्या आसवांपेक्षा उद्धव ठाकरेंसाठी प्रचार महत्त्वाचा, अमरावतीतल्या सभेत दुर्घटनेबद्दल चकार शब्दही नाही, सभेनंतर मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार
4. बुलेट ट्रेन कशाला हवी? त्यापेक्षा लोकलसेवा सुधारा, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरुन शरद पवारांचे सरकारवर ताशेरे
5. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर भाजपही लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, संध्याकाळी संसदीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय
6. निवडणुकांच्या तोंडावर पोलीस कारवायांना वेग, नागपूरच्या सावनेरमधून 80 लाखांची रोकड जप्त, नेत्रावती एक्स्प्रेसमधून 532 बाटल्या दारु हस्तगत























