LIVE BLOG : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणला पावसाचा तडाखा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
14 Apr 2019 11:27 PM
नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याची हत्या, लूट, घरफोडीच्या उद्देशाने हत्येचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
अहमदनगर : शहरातील सत्था कॉलनी येथे घराचे काम सुरु असताना अंगावर भिंत पडून 3 मजुरांचा मृत्यू
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात वीज पडून तिघांचा मृत्यू, तर दिंडोरीच्याच शिवणई गावात वीज पडून एका गाईचा मृत्यू, येवला तालुक्यातही एका गायीचा मृत्यू
ठाणे : अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, पावसामुळे संपूर्ण शहरातला वीजपुरवठा खंडित, बदलापूर आणि मुरबाड भागातही अवकाळी पावसाला सुरुवात
नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसर, येवला तालुक्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी, कांदा शेतकऱ्यांची चिंता वाढली
अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी गावात 100 लोकांना जेवणातून विषबाधा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भोजन कार्यक्रमातील घटना, जेवणानंतर लोकांना जुलाब, चक्कर आणि उलट्यांचा त्रास, रुग्णांवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
इंदापूर : भारतातील प्रत्येक नागरिकाने लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी शहरात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने Run For Vote या दौडचे आयोजन करण्यात आले. लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठीचा आज शेवटचा रविवार, मतदारांच्या भेटीगाठींसाठी उमेदवार रस्त्यावर, कुठे बाईक रॅली तर कुठे दारोदार भटकंती
पुढील दोन दिवस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, काल (13 एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, आंबे आणि द्राक्षबागांचे मोठं नुकसान
सोलापूर : सोलापूरात उन्हाचा पारा वाढत असताना प्रचाराची रणधुमाळी ही चांगलीच रंगलेली पाहायला मिळतीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी सकाळी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
काँग्रेस, आप, तेलगू देसम पार्टी ईव्हीएमविरोधात आक्रमक, सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार, हिम्मत असेल तर ईमानदारीने निवडणूक लढण्याचे अरविंद केजरीवाल यांचे आव्हान
अकोल्यातील अकोट तालुक्यातील हिंगणी येथे जेवणातून 70 लोकांना विषबाधा. रुग्णांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी जेवणातून झाली विषबाधा
भिवंडी : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, डोंगराला रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई
मुंबई विद्यापीठाच्या डीएड परीक्षेच्या वेळापत्रकात गोंधळ, डी एड परीक्षेचा विद्यार्थ्यांचा निकाल लागण्यापूर्वीच एटिकेटीची परीक्षा, उद्यपासून एटीकेटीची परीक्षा सुरु होणार.
पश्चिम महाराष्ट्रात काही भागात गारांसह पाऊस, पुढील दोन दिवस हेच वातावरण कायम
'कॉंग्रेसपक्ष भेटीवरून गाढवपणा करणार याची मला जाणीव होती, काँग्रेस हा गाढवांचा पक्ष' सुशीलकुमार शिंदेंचा कॉंग्रेसवर घणाघात
सावंतवाडी तालुक्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ठीक-ठिकाणी नुकसान झाले आहे. सावंतवाडीतल्या निगुडे येथे सोसाट्याच्या वारा सुटल्यामुळे आंब्याचे झाड कोसळून तीन विजेचे खांब कोसळले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाचा निगुडे गावाला फटका, वीज वाहीन्या तुटल्या, संपुर्ण गाव अंधारात
पार्श्वभूमी
1. आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती. दादर येथील चैत्यभूमीवर नागरिकांची गर्दी. दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
2. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कुणाच्या नावावर, भाजपची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी तर मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
3. निवडणूक काळात राज्य राखीव पोलीस दलाची अवस्था बिकट, सलग तीन दिवस झोप नाही, उपासमारीची वेळ, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल
4. पुणे, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाच्या सरी, पावसामुळे बारामतीत महायुतीचा बॅनर कोसळला
5. 'तुमचं ठरलंय'' तर ''आम्ही पण ध्यानात ठेवलंय'', कोल्हापूरच्या सभेत सतेज पाटलांना पवारांचं खुमासदार उत्तर, पाटलांच्या महाडिकांविरोधातल्या मोहीमेवर पवारांचा इशारा
6. राफेल करारानंतर अनिल अंबांनींच्या फ्रान्समधील कंपनीला 1 हजार 120 कोटींची करमाफी, फ्रान्सच्या ले मॉन्ड वृत्तपत्राच्या दाव्यानं खळबळ