मुंबई : बीड हत्याकांडप्रकरणी राज्य सरकारकडून आता न्यायालयीन चौकशीही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, कमिटी नेमण्यात आल्याने बीडमधील घटेचा तपास अधिक गतीमान झाला आहे. आधी सीआयडी, पुन्हा एसआयटी आणि आता न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याने आरोपींचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्यातच, खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतोष देशमुखचे (Santosh Deshmukh) भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासावर समाधान व्यक्त केलं आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनीही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले. त्यातच, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी माहिती दिली. यावेळी, वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली यांनी केलेल्या आरोपावर आपण बोलणार नसल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भेटतील, नंतर ते दावोसला जाणार आहेत, त्याआधी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल असे त्यांनी मला सांगितले. तर, न्यायालयीन चौकशीवरही त्यांनी भाष्य केलं. एखादी जरी त्रुटी पोलिसांकडून राहिली तरी न्यायालयीन चौकशीत टी राहू शकत नाही, यातील सगळे आका बाका सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीमध्ये फायदा होईल, त्यामुळे ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, असेही आमदार धस यांनी म्हटले. तर, आका सोपा नाही, त्याच्याकडे 17 मोबाईल होते, नवीन माहिती तुम्ही सांगितली की अमेरिकेतलं सीम वापरत होता. तो ठराविक लोकांना काही रक्कम प्रत्येक महिन्याला पाठवत होता यावरून समजून जा, असे म्हणत नाव न घेता सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे मोठ्या आकाकडे इशारा केला आहे.
ती माझी बहीण, त्या माऊलीवर बोलणार नाही
वाल्मिक कराडच्या पत्नीने आमदार सुरेश धस यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलण्यात धस यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्या माझी भगिनी आहेत, त्यांवर मी काही बोलणार नाहीत. माझ्याबाबत व्हिडिओ वगैरे काही सापडू शकत नाही, लई धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलोय, माझं काहीही व्हिडिओ, फिडिओ सापडणार नाही. मला त्या माऊलीवर काहीही बोलायचं नाही, ती माझी बहीण आहे. त्या माऊलीवर मी बोलणार नाही, त्यांच्याकडील पुरुष मंडळीने काही बोलले तर मी बोलणार, आकाच्या आकाने बोललं तरी मी बोलेन, असे म्हणत वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपवर सुरेश धस यांनी म्हटले.
खंडणीला आडवा आला म्हणून संपवला
खंडणीला आडवा आला म्हणून संतोषची हत्या झाली, एसआयटी हेच म्हणते. आम्ही राजकारणी आहोत, आम्ही काहीही बोलू, पण एसआयटी हेच सांगत आहे की, खंडणीच्या आडवा आला म्हणून त्याला संपवला, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
राष्ट्रवादीवर मी काय बोलू
राष्ट्रवादीवर मी काय बोलू, माझ्यासारख्या पामराने त्यांवर काय बोलावे. त्यांच्यावर दबाव आहे की नाही हे मी कसे सांगणार, त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा, असे धस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसदर्भात बोलताना म्हटले.
हेही वाचा
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर