LIVE BLOG : आज दिवसभरात... 14 मार्च

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर खलबंत, प्रचाराचा मुहूर्त आणि कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा
2. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेकडे लक्ष, सुजयचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नाही, शरद पवारांची खोचक टीका
3. माढ्याचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह गिरीश महाजनांच्या भेटीला, तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरांच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांना स्थान
4. भारतात बोईंग 737 मॅक्स विमानाच्या वापरावर बंदी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा महत्वाचा निर्णय
5. भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मसूद अजहरचा आज फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाकडे लक्ष
6. 'कलंक' सिनेमाचा टीझर रिलीज, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन मुख्य भूमिकेत, 17 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला























