LIVE BLOG : सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस

Background
1. वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जण गंभीर जखमी, पालिकेनं पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
2. ठाण्यातील कोपरी पूल धोकादायक अवस्थेत, दोन दिवसांपूर्वी पुलाचे प्लास्टर कोसळलं, अधिकाऱ्यांकडून तात्पुरती मलमपट्टी
3. मोदी सरकारविरोधात राज ठाकरेंच्या राज्यभरात सहा सभा, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रेल्वेने रवाना, उद्या नांदेडमध्ये पहिली सभा
4. बोरिवलीत भाजपच्या प्रचार फेरीचा स्थानिकांकडून निषेध, गोपाळ शेट्टींना काळे झेंडे दाखवले, एका स्थानिकाला अटक
5. शाळेतील शिपायाकडून तिसरीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग, बदलापूरच्या चंद्रशेखर मेमोरियल शाळेतील घटना
मनसे कार्यकर्त्यांकडून शिपायाला चोप
6. नवऱ्यानं दाढी वाढवली म्हणून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, भोपाळमधल्या प्रकरणाची कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा























