LIVE BLOG : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

Background
१. कोल्हापूर, सांगलीत पाचव्या दिवशीही महापुराचं थैमान, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी,औषधांची मोठी गरज, राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु
२. आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा
३. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक ट्रस्ट, 100 ट्रक भरून शुद्ध पाणी पाठवणार, तर पवारांच्या आवाहनानंतर बारामतीतून एक कोटींची मदत
४. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष आज ठरण्याची शक्यता, गांधी घराण्याबाहेरील नावाची चर्चा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
५. श्वसनाच्या त्रासामुळे अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची एम्सची माहिती, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा भेटीला
६. 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, हिंदीमध्ये अंधाधून तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, नाळमधील चैत्या ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार























