LIVE BLOG : ठाण्यात 17 वर्षीय तरुणाची 32व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Background
1. पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, विदर्भात मॅरेथॉन सभा तर औसात मोदी आणि ठाकरे एकत्र
2. साठीनंतर शेतकरी, दुकानदारांना पेन्शन आणि बळीराजाला सरसकट 6 हजाराचं अनुदान , लोकसभेसाठी भाजपचं 75 कलमी संकल्पपत्र, पुन्हा एकदा राम मंदिराचा नारा
3. विंग कमांडर अभिनंदनकडून पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडतानाचा क्षण रडारमध्ये रेकॉर्ड, पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेची सणसणीत चपराक
4. राष्ट्रवादीनं जातीयवादाचं विष पेरलं, माझाला दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा घणाघात, मनसे म्हणजे उमेदवार नसलेली उनसे झाल्याचीही टीका
5. बारामतीतून सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित, सांगलीतील सभेत चंद्रकांत पाटलांचा दावा, पवारांवरही टीकास्त्र
6. महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईला प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सर्वात मोठी बोली, तेलगू टायटन्सची कोल्हापूरच्या शिलेदारावर एक कोटी 45लाखांची बोली























