LIVE BLOG | मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन तूर्तास स्थगित

Background
1. आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान, राहुल गांधी, सोनिया गांधींचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार, तर भाजपचे राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोडही रिंगणात
2. राजीव गांधींवरच्या विधानासाठी देश मोदींना माफ करणार नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा, राहुल प्रियंकाचाही हल्लाबोल
3. राफेलवरून टीका करणाऱ्या राहुल गांधींवर अनिल अंबानींचा पलटवार, युपीएच्या काळात मंजूर केलेल्या 1 लाख कोटींच्या प्रकल्पाची आवर्जून आठवण
4. लातूरच्या चेरापाटीजवळ टेम्पो आणि ऑटोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी, एका वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली
5. रशियात पेटत्या विमानाचं ईमर्जन्सी लँडिंग, दुर्घटनेत 41 प्रवाशांचा मृत्यू तर 33 प्रवासी बचावले
6. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकडून कोलकात्याचा 9 विकेट्सनी धुव्वा, विजयासह आयपीएल गुणतालिकेत मुंबईनं गाठलं अव्वल स्थान























